Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 7 June 2026, 18:02

मुंबई: घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ झाल्यानंतर राज्यात राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती खर्चावर अतिरिक्त भार पडणार असल्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. त्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

केंद्र सरकारने 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. गेल्या काही महिन्यांतील ही दुसरी मोठी दरवाढ मानली जात आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याचे म्हटले. महागाई नियंत्रणात असल्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात टप्प्याटप्प्याने दरवाढ केली जात असल्याची टीका त्यांनी केली. अशा निर्णयांची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना भविष्यात चुकवावी लागू शकते, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दरवाढीमागे जागतिक परिस्थिती कारणीभूत असल्याचे सांगितले. युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील अनेक देशांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. इंधनाच्या जागतिक बाजारपेठेतील चढ-उतारांचा परिणाम भारतावरही होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

तसेच, यापूर्वीही आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढल्यावर देशात किमती वाढल्या आणि दर कमी झाल्यावर त्यात घटही करण्यात आली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. केंद्र सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गॅस दरवाढीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून आगामी काळात यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16

भरधाव कंटेनरची तीन कारला पाठीमागून धडक; खेड-शिवापूरजवळ अपघातात वाहनांचे नुकसान

Saturday, 29 August 2026, 19:56

थेऊरमध्ये विजेचा शॉक लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

Saturday, 29 August 2026, 19:41
Next Post

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp