Friday, September 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

१३५ कोटींच्या बँक घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई; मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी टाकला छापा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 17 September 2026, 21:42

पुणे : १३५ कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. गजानन गंगामाई इंडस्ट्रीज एलएलपी आणि इतर संबंधितांविरोधात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) ही कारवाई करण्यात आली. मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमधील सहा ठिकाणी ईडीने छापे टाकले. कर्जाच्या रकमेत गैरव्यवहार करून ती शेल कंपन्यांच्या माध्यमातून वळवण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे.

ईडीच्या कारवाईदरम्यान सिंगापूरमधील इंडियन बँकेच्या खात्यात असलेली ३.७ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे ३५.७१ कोटी रुपयांची मुदत ठेव (FD) गोठवण्यात आली आहे. याशिवाय BMW 320 LD ग्रँड लक्झरी लाईन कार, डिजिटल उपकरणे आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कथित बनावट कॉल सेंटरच्या नेटवर्कवरही ईडीने कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालय आणि अमेरिकन सिक्रेट सर्व्हिस यांच्या संयुक्त कारवाईत चंदीगड, हैदराबाद आणि पुणे परिसरातील बनावट कॉल सेंटरचा तपास करण्यात आला. पटियाला, पुणे आणि चंदीगडमध्ये एकूण चार ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या कारवाईत चंदीगडमधील पटियाला परिसरात दोन आणि पुण्यात एक अशी तीन सुरू असलेली बनावट कॉल सेंटर आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. ईडीच्या छाप्यावेळी या ठिकाणी सुमारे २२० जण काम करताना आढळले. अमेरिकन नागरिकांना वेगवेगळी खोटी कारणे सांगून फोन करण्यात येत होते आणि त्यांच्याकडून पैसे उकळले जात असल्याचा तपास ईडीकडून सुरू आहे.

 

चंदीगडमधील एका घरातून पटियाला येथील कॉल सेंटरचे नियंत्रण आणि समन्वय केला जात असल्याचे तपासात समोर आल्याचे ईडीने म्हटले आहे. या कारवाईदरम्यान ६६ मोबाईल फोन, १३ लॅपटॉप, हार्ड डिस्क, कम्युनिकेशन उपकरणे, रोकड आणि विविध कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

डॉलरमध्ये मिळणारी कथित फसवणुकीची रक्कम भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित करण्यासाठी काही व्यक्ती कार्यरत असल्याचा ईडीला संशय आहे. या अनुषंगाने कॉलिंग स्क्रिप्ट, डायलर, व्हीओआयपी प्रणाली तसेच पैशांच्या व्यवहारांची तपासणी सुरू आहे. या संपूर्ण कारवाईमुळे कथित सायबर फसवणूक आणि बनावट कॉल सेंटरच्या नेटवर्कचा तपास आणखी व्यापक होण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण नवीन वळणावर! सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर सतीश सालियन थेट ‘मातोश्री’वर बजावणार मानहानीची नोटीस

Thursday, 17 September 2026, 22:56

पुण्याच्या इनर रिंग रोडसाठी तब्बल १०८८ कोटींचा खर्च! भूसंपादनाच्या प्रस्तावाला अखेर अधिकृत मान्यता

Thursday, 17 September 2026, 22:16

१३५ कोटींच्या बँक घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई; मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी टाकला छापा

Thursday, 17 September 2026, 21:42

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; वाचा संपूर्ण वेळापत्रक

Thursday, 17 September 2026, 21:07

हडपसर, कोंढवा, खराडीसह ६ ठिकाणी नव्या सदनिका; घर खरेदीदारांसाठी मोठी खूशखबर

Thursday, 17 September 2026, 20:58

मराठवाडा थेट पश्चिम महाराष्ट्राशी जोडला! बीड ते पुणे रेल्वे सेवा सुरू; अवघ्या ७ तासांत होणार प्रवास

Thursday, 17 September 2026, 20:11
Next Post

पुण्याच्या इनर रिंग रोडसाठी तब्बल १०८८ कोटींचा खर्च! भूसंपादनाच्या प्रस्तावाला अखेर अधिकृत मान्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp