Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : भांबुर्डा येथील राखीव वनक्षेत्रात राडारोडा टाकणारे दोन डंपर जप्त ; अवैध कचरा टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले, वनविभागाची कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 24 April 2026, 16:28

पुणे, : शहरातील भांबुर्डा वनपरिक्षेत्रातील राखीव वनक्षेत्रात छुप्या पद्धतीने बांधकामाचा राडारोडा आणि अजैविक कचरा टाकणाऱ्या दोन खाजगी डंपरवर वन विभागाने धडक कारवाई केली आहे. बुधवारी (ता. 22) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, दोन्ही डंपर जप्त करण्यात आले आहेत.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, भांबुर्डा येथील सर्वे नंबर 97 मधील राखीव वनक्षेत्रात दोन डंपर कोणत्याही परवानगीशिवाय राडारोडा टाकत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. वन अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत डंपरला अटकाव केला. यावेळी डंपरमध्ये विटांचे तुकडे, सिमेंट, माती, दगडगोटे आणि प्लास्टिक असा अजैविक कचरा आढळून आला. चालकांकडे अधिकृत कागदपत्रांची विचारणा केली असता, त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले.

वन विभागाने टाटा कंपनीचे दोन डंपर ताब्यात घेतले आहेत. ज्यामध्ये MH 43 F 0927 व MH 12 HD 2461अशा नंबरचे दोन्ही डंपर जप्त करून वनपरिक्षेत्र कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. सदर कारवाई वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले, वनपाल विशाल यादव आणि वनरक्षक कृष्णा हाक्के यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.

वन विभागाचे जनतेला आवाहन
वनक्षेत्रात अवैध कचरा, राडारोडा किंवा अजैविक साहित्य टाकणाऱ्यांविरुद्ध विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून गस्त वाढवण्यात आली आहे. वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की वनक्षेत्रात आग लागणे, वन्यजीवांना इजा होणे किंवा अवैध कामे होत असल्यास तात्काळ माहिती द्यावी. तक्रारीसाठी किंवा माहिती देण्यासाठी 1926 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. जंगलाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून अशा गुन्हेगारांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा वन विभागाने दिला आहे.

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Friday, 4 September 2026, 22:53

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46
Next Post
Pune Crime: Brother-in-law attacked with "cement gattu" after saying he would not send his sister! Brother-in-law and brother-in-law clash over going to visit their in-laws; Both seriously injured

Shikrapur News : तळेगाव ढमढेरे येथे यात्रेच्या फ्लेक्सवरून जगताप आणि घुले गटात तुंबळ हाणामारी ; शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp