Sunday, April 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे ‘ओपन स्पेस’ची जागा ट्रस्टच्या ताब्यात; निर्णयाविरुद्ध अपील करणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 26 November 2024, 13:51
special drive for hospital checking by PMC Pune

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनीमधील ‘ओपन स्पेस’ची ६ हजार ५४ चौरस मीटर जागा न्यायालयाच्या आदेशानुसार लक्ष्मीबाई चास्ट चॅरिटेबल ट्रस्टने ताब्यात घेतली आहे. या जागेच्या ताब्यावरून पुणे महानगरपालिकेत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

 

पुणे महापालिकेने १९८८ साली विजयानगर कॉलनी येथील ओपन स्पेस या जागेचा गैरवापर होत असून, या ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीप्रमाणे जागा मालकास नोटीस पाठविली होती. केवळ एक रुपयाच्या नाममात्र मोबदल्यात ही जागा पालिकेने ताब्यात घेतली. त्याविरुद्ध ट्रस्टने कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दाद मागितली होती. या दाव्याचा १९९९ साली निकाल लागला. सदर निकालानुसार जागेचा ताबा घेण्यापासून पालिकेला मनाई करण्यात आली होती. ही जागा ताब्यात घेताना आवश्यक ती प्रक्रिया पार पाडली गेली नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते. यानंतर पालिकेने २००० साली पुन्हा जागा ताब्यात घेण्यांची प्रक्रिया सुरू केली. पालिकेने यासंदर्भात जाहीर प्रकटन दिले होते. तसेच ट्रस्टला नोटीस पाठविली होती. त्या वेळी पालिकेने पुन्हा ताबा घेतला. याविरुद्ध ट्रस्टने पुन्हा एकदा न्यायालयात दाद मागितली.

या दाव्याचा २००७ साली निकाल लागला. तेव्हाही पुणे महापालिकेच्या विरोधात निकाल गेला होता. महापालिकेने पुन्हा एकदा २००८ साली वरिष्ठ स्तर न्यायालयात दाद मागितली. परंतु, यावर सुनावणीच झाली नाही. दरम्यान, ट्रस्टने २०२० साली न्यायालयात दरखास्त दाखल करून २००७ च्या न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात महापालिकेला नोटीस मिळाली नाही, असा दावा विधी विभागाकडून केला जात आहे.

निर्णयाविरुद्ध अपील करणार

या जागेच्या ताब्याच्या कागदपत्रांवर महापालिकेच्या वतीने कोणी सह्या केल्या नाहीत. न्यायालयाकडे पालिकेच्या विधी विभागाने अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये दरखास्तीवर अंमलबजावणी करण्यापूर्वी न्यायालय कोणत्या गोष्टींचा विचार करू शकते याची माहिती दिली आहे. महापालिकेने ताबा देण्यास विरोध केला आहे. या हरकतीचा विचार करावा असे अर्जात नमूद केले आहे. या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासंदर्भात विधी विभागाकडून विचार केला जात आहे, असे पालिकेच्या विधी सल्लागार अॅड. निशा चव्हाण यांनी सांगितले.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime

Pune Crime News : पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या वादातून तरुणाचा खून ; चार आरोपींना अटक, भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई..

Sunday, 26 April 2026, 12:42
missing link project

Missing Link Project : मुंबई-पुणे मिसिंग लिंक’चे 1 मे रोजी लोकार्पण ; जगातील सर्वात रुंद बोगदा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार..

Sunday, 26 April 2026, 12:05

Daund News : देउळगाव गाडा येथील मेंढपाळ कुटुंबाचे घर फोडले ; दीड लाखांचे दागिने आणि रोकड लंपास..

Sunday, 26 April 2026, 11:35

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर डिनर पार्टीत गोळीबार! वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेल मध्ये थरार, हल्लेखोराला बेड्या

Sunday, 26 April 2026, 11:09

Pune News : सोशल मीडियावर तलवारीचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणारा ताब्यात ; गुन्हे शाखा यूनिट- 2 ची कारवाई

Sunday, 26 April 2026, 10:45

Mseb News : लोणी कॉर्नर येथे कचऱ्याच्या आगीमुळे डीपी जळाली ; २०० हून अधिक वीजजोडणी ठप्प

Sunday, 26 April 2026, 10:37
Next Post
Shivsena UBT likely to walk out from mahavikas aghadi maharashtra

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतच्या आघाडीवर पुनर्विचार सुरु

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.