Daund News : यवत, (पुणे) : दौंड तालुक्यातील देउळगाव गाडा परिसरात चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला असून, एका मेंढपाळ कुटुंबाचे बंद घर फोडून सुमारे 1 लाख 74 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. भरवस्तीत झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून यवत पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. Daund News

मिळालेल्या माहितीनुसार, देउळगाव गाडा येथील मानेवस्तीवर राहणारे सतिष विठ्ठल माने (वय 44, रा. व्यवसाय शेती व मेंढपाळ) हे आपल्या कुटुंबासह राहतात. गुरुवारी (ता. 23) ते शुक्रवारी (ता. च्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना, अज्ञात चोरट्यांनी संधी साधून घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडला. चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी शोकेस कपाटाचे कुलूप उचकटले. Daund News

यावेळी चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि सोने खरेदीच्या महत्त्वाच्या पावत्या, 30 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. Daund News सतिष माने यांनी याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१ (४) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत. Daund News







