Accident | वल्लभनगर, (पुणे) : दोन एसटी बसच्या मध्ये चिरडून वल्लभनगर एसटी बस मधील मॅकेनीक विभागातील साहाय्यक महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवारी (ता. ०८) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
शिल्पा कैलास गेडाम (वय – ३८) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वल्लभनगर आगार प्रशासनाकडून पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार बस चालवणारा परतूर आगाराचा चालक प्रशांत वाडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी परतूर (जालना) आगाराची बस पार्किंगधून काढण्यासाठी चालक प्रयत्न करत होता. मात्र, मध्ये अहमदपूर आगाराची (लातूर) बस उभी असल्याने परतूर आगाराच्या बसचा वाहक प्रशांत रमेश वाडकर हा अहमदपूर आगाराची बस बाजूला काढण्यासाठी त्या बसच्या चालकाच्या सीटवर बसला. त्याने ती बस सुरू केली मात्र, तिचा ब्रेक न लागल्याने ती समोर शिल्पा या ऑईल तपासत असलेल्या शिवशाही बसवर आदळली.
या दोन्ही बसच्यामध्ये दबल्या गेल्याने शिल्पा गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वल्लभनगर आगार प्रशासनाच्या वतीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.
दरम्यान, अवघ्या काही सेकंदात झालेल्या अपघात इतका भीषण होता की, अहमपूर आगाराच्या ज्या बसने शिवशाही बसला धडक दिली. त्या शिवशाहीच्या काचा फुटल्या तसेच पुढील भागाचे नुकसान झाले. यासोबत अहमदपूर आगाराच्या देखील बसच्या काचा फूटून पुढील भाग चेंबला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Dive Ghat Accident | दिवे घाटात झालेल्या अपघातात बारामती व सासवड येथील दोघांचा मृत्यू