Pimpri Crime – पिंपरी, (पुणे) : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिसरातून वेगवेगळ्या भागात गर्दीचा फायदा घेऊन नागरीकांचे मोबाईल चोरणाऱ्या तसेच घरफोडी करणाऱ्या एका अल्पवयीनसह तिघांना गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. (Pimpri Crime) त्याच्याकडून पोलिसांनी विविध कंपनीचे एकुण ६९ मोबाईल असा ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pimpri Crime)
गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी..
सोमा दुर्गप्पा चौधरी (वय १९, मुन्नाभाई चाळ, पवार पेट्रोलपंप जवळ, नेहरुनगर, पिंपरी) मुदस्सर अहमद सय्यद (वय-२१, रा. वल्लभनगर, बॅडमिंटन हॉल जवळ, पिंपरी, व एक विधी संघर्षीत बालक असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी २३ मोबाईल जप्त करुन एकुण ०८ जबरी चोरी व ०१ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत वाढत्या जबरी चोरी, घरफोडीच्या अनुशंगाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखा युनिट १ चे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांना वाढत्या जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्हयांना आळा घालण्याबाबत आदेश दिले होते.
सदर गुन्ह्यांचा युनिट एकचे तपास पथक गस्त घालीत असताना एका खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार संशयित तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी भोसरी एम.आय.डी.सी अंतर्गत ०७ व सांगवी पोलीस ठाणे अंतर्गत ०२ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडुन पोलीस ठाण्यात जबरी चोरीच्या गुन्हयांतील २३ मोबाईल जप्त करुन एकुण ०८ जबरी चोरी व ०१ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
दरम्यान, गहाळ नोंद असलेले मोबाईल पैकी ४६ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. अदयापपर्यंत १८ मोबाईल मुळ मालकांना परत करण्यात आले असुन उर्वरीत मोबाईल त्यांचे मालकांना परत देण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच त्याच्याकडून पोलिसांनी विविध कंपनीचे एकुण ६९ मोबाईल असा ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, व पोलीस निरीक्षक संजय तुंगार (सायबर गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख पोलीस अंमलदार फारुक मुल्ला, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, स्वप्नील महाले, मारुती जायभाय, विशाल भोईर व नागेश माळी यांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri Crime | कोयता गॅंगची दादागिरी ! आम्ही इथले भाई म्हणत तरुणावर कोयत्याने वार; चिखलीतील घटना