पुणे Hospital News : राज्यातील धर्मदाय रुग्णालये नियमांचे पालन करीत नसल्याच्या आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘आरोग्य मित्र’नेमण्यात येणार आहेत. (Hospital News) हा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला असल्याचे सहधर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी सांगितले. (Hospital News) त्यामुळे धर्मदाय रुग्णालयांच्या मनमानीला चाप बसणार आहे. (Hospital News) असे बोलले जात आहे. (Hospital News)
धर्मदाय रुग्णालयात गरिबांसाठी २० टक्के राखीव खाटा
या रुग्णालयांतील योजनांची माहिती गरजूंना मिळावी, यासाठी मोबाइल अॅप आणि वेबसाइटही विकसित करण्यात येणार आहे. गरीब रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी धर्मदाय रुग्णालयात वीस टक्के खाटा राखीव ठेवण्यात येतात. मात्र, खाटा उपलब्ध नाही असे सांगून काही रुग्णालये उपचार करण्यास टाळाटाळ करतात, असे अनेकदा निदर्शनास आले आहे.
धर्मादाय रुग्णालयांमध्ये वार्षिक एक लाख ८० हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना मोफत उपचार देण्यात येतात. वार्षिक तीन लाख ८० हजार किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा दाखला असल्यास बिलांमध्ये ५० टक्के सवलतीत उपचार देण्यात येतात.
राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्र नेमण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. प्रत्येक रुग्णालयांमध्ये किमान एक आरोग्य मित्र नेमण्यात येईल. यामुळे कामकाजात पारदर्शकता येईल. असेही बुक्के यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime | दारुड्या वडिलांचा मुलाकडून डोक्यात दगड घालून खून ; मुळशीतील घटना, आरोपी अटकेत