Pune Crime पुणे : पुणे शहरातून (Pune Crime) संतापजनक बातमी समोर आली आहे. चारित्र्यांच्या संशयातून निर्दयी पतीने पत्नीचे हातपाय बांधून तिच्या गुप्तांगाला हीटरने गरम चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर हात पाय बांधलेल्या अवस्थेत पत्नीसोबत अतिशय क्रूररित्या शारीरिक संबंध ठेवले. हा भयंकर प्रकार 30 एप्रिल रोजी घडला. या घटनेनंतर परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी 35 वर्षीय पत्नीने पतीविरोधात कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. यावरून 40 वर्षीय आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पतीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार..!
पीडित पत्नी माोबाईल बघत होती त्यावेळी आरोपी पतीने ती कोणासोबत बोलत असल्याचा संशय घेतला व महिलेच्या हाताला धरून बेडरुम मध्ये घेऊन गेला. त्यानंतर बेडरुमचा दरवाजा बंद करून पीडितेच्या सलवार आणि ओढणीने त्यांचे हातपाय बेडला बांधले. त्यानंतर हीटर गरम करून फिर्यादीच्या गुप्तांगावर त्याची चटके दिले. इतकेच नाही तर अतिशय क्रूररित्या त्याने पत्नी सोबत शरीर संबंध ठेवले. या सर्व प्रकार बघून तक्रारदार महिलेची चार मुले घाबरून गेली.
त्यानंतर आरोपीने घृणास्पद कृत्य करत पीडितेच्या तोंडात स्वतःचा पाय घातला. इतकेच नाही तर अंगावर लघु शंका देखील केली. त्यानंतर फिर्यादीच्या हातापायावर आणि डोक्यावर खलबत्त्याने मारहाण केली. यावेळी मुलांनी आरडो आरोड केली तेव्हा आरोपीने दरवाजा उघडला. त्यानंतर देखील त्याने मुलांसमोर अश्लील कृत्य केले.
आरोपीने पत्नीसोबत अतिशय घृणास्पद कृत्य करत फिर्यादीच्या तोंडात स्वतःचा पाय घातला. इतकेच नाही तर अंगावर लघु शंका देखील केली. त्यानंतर फिर्यादीच्या हातापायावर आणि डोक्यावर खलबत्त्याने मारहाण केली. दरम्यान मुली बाहेर जास्त आरडाओरडा करू लागल्याने आरोपीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर आरोपीने 16 आणि 11 वर्षीय मुलीकडे पाहून देखील अश्लील कृत्य केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!