राहुलकुमार अवचट
Daund Crime News : यवत, (पुणे) : थायरॉईडच्या (thyroid disease) आजाराला कंटाळून एका ज्येष्ठ नागरिकाने लिंबाच्या झाडाला (lemon tree) गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना ( shocking incident) राहु (ता. दौंड) परिसरात (Goropatta area of Rahu) घडली आहे. सोमवारी (ता. ०१) दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास ( afternoon) राहू ग्रामपंचायत हद्दीतील गोरोपटटा परिसरात हि घटना घडली आहे. (Daund Crime News)
यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
वामन विष्णु शिंदे (वय – ६४ रा. गोरोपटटा, राहु, ता. दौंड असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मुलगा संदिप वामन शिंदे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वामन शिंदे यांना थायरॉईड आजार होता. या आजारामुळे शिंदे त्रस्त झाले होते. सोमवारी संध्याकाळी घराशेजारी असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत तात्काळ मुलगा संदीप यांनी यवत पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान, सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक कोल्हे यांनी भेट दिली असून याबाबत अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कदम हे करीत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लीक करा.