सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी आज शनिवारी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. कर्नाटकातील विजापूरपासून १० किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळते. त्याठिकाणी भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ४.६ इतकी नोंदवली गेली. अशी माहिती सोलापूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील विजापूरपासून १० किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळाली आहे. त्याठिकाणी भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ४.६ इतकी नोंदवली असून सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होते.
दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातील काही गावांमध्ये सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. येथील काही ग्रामस्थांनी ही माहिती दिली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. स्थानिक प्रशासनानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.