Hadapsar Crime हडपसर, (पुणे) : कदमवाकवस्ती येथील शेतकरी कामगार महिलेच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करुन तिचा खून करून फरार असलेल्या आरोपीला कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथून हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राजेश अशोक मुळेकर (वय- अंदाजे ३५, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती ता. हवेली) असे खून करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तर उषा अशोक देशमुख (वय ५०, रा. माळवाडी, कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
राजेश मुळेकर हा विहिरीतील मोटर चोरत असताना उषा देशमुख यांनी पाहिले. यावेळी देशमुख यांनी मुळेकर याला येथे काय करतो असे विचारले. या हटकल्याच्या कारणावरून त्याच्याजवळ असलेल्या तीक्ष्ण हत्याराने देशमुख यांचा तीक्ष्ण हत्याराने खून केला व मृतदेह विहरीत फेकून दिल्याची कबुली आरोपी मुळेकर याने हडपसर पोलिसांना दिली.
दरम्यान, कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील शेतकरी कामगार महिलेच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करुन तिचा खून करून मृतदेह विहीरीत टाकून दिल्याची घटना सोमवारी (ता. २४) मांजरी येथील कुरण फार्म येथे दुपारी अडीच ते सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या दरम्यान घडली होती. याबाबत स्नेहल अभय काळभोर (वय ५०, रा. मांजरी फार्म, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपास हडपसर पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Hadapsar Crime : हडपसर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक