पुणे : अनेकांना चहासोबत चटपटीत पदार्थ, फरसाण, नमकीन खायला आवडचे. पण तुम्हाला माहित आहे का, तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. चहाप्रेमी चहा प्यायची कुठलीही संधी सोडत नाहीत. पण हे करत असताना अनेक वेळा अनवधानाने अशी काही चूक होऊन जाते, ज्यामुळे व्यक्तीच्या आरोग्याला हानी पोहोचते. जाणून घ्या चहासोबत नमकीन खायचे परिणाम
ॲसिडिटीची समस्या – ड्रायफ्रुट्स असलेल्या नमकीनसोबत चहा प्यायल्याने ॲसिडिटी होऊ शकते. नमकीनमध्ये नट्सही टाकले जातात. नट्सचे सेवन चहासोबत करू नये.
अपचनाची समस्या – चहासोबत आंबट पदार्थांचे सेवन करू नये. चहासोबत आंबट पदार्थ खाल्ल्याने अपचन आणि पोटात गॅस तयार होतो. कधी कधी नमकीन टेस्टला आंबट गोड देखील असते. तेही चहासोबत घेऊ नये.
पोटात दुखणे – नमकीनमध्ये रिफाइंड कार्ब्स असतात, जे पचायला खूप वेळ लागतो. यासोबत चहा घेतल्यास पोटात दुखू शकते.नमकीन पदार्थ दुधाच्या पदार्थांसोबत खाऊ नयेत. चहामध्ये दूध घालून त्यासोबत खारट खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
पचनसंस्थेवर वाईट परिणाम – चहासोबत हळद असलेले फरसाण खाणे टाळा. नमकीन पदार्थात हळद असते. यामुळे पचनसंस्थेचे नुकसान होऊ शकते.
पोटदुखी – चहा सोबत गाठी, फाफडा, फरसाण, शेव, मठरी असे पदार्थ खायला अनेकांना आवडतात. हे पदार्थ बेसनपासून बनवलेले असते. हे चहा सोबत खाल्ल्याने पोटदुखी होऊ शकते.