Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कारखान्यात ऊसतोड करणाऱ्या मजुरांची टंचाई; शेतकरी हतबल

गणेश सूळby गणेश सूळ
Wednesday, 27 November 2024, 16:14

-गणेश सुळ

 

केडगाव : परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर ऊसतोडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दौंड भागातील कारखान्याचे धुराडे पेटले खरे, मात्र कारखान्याकडे ऊसतोड करणा-या मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ऊसतोडीच्या व्यवस्थापनात मोठ्या अडचणी तयार झाल्या आहेत. यातही वशिलेबाजी आल्याने ऊसतोड कार्यक्रमाचे गणित यंदा पूर्णता बिघडले आहे. त्यामुळे कारखान्याकडे केलेल्या नोंदणीनुसार ऊसाला तोड मिळेल का नाही? या बाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. अन् तशी परिस्थिती सत्यात उतरताना दिसत आहे.

अवकाळीशी झगडता झगडता नाकी नऊ आले असताना देखील शेतक-यांनी आपले पिक टिकवले. परंतु ऊसाला वेळेत तोड मिळत नसल्याने शेतकरी चांगलेच हतबल झाले आहेत. दौड तालुक्यांत कारखान्याकडे टोळीची यंत्रणा अपुरी पडत असल्याने कुणी टोळी देता का, टोळी.., असे म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. उसाला तोड मिळविण्यासाठी कारखान्याच्या यंत्रणेकडे मनधरणी करावी लागत आहे.

अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे उसाला तुरे फूटण्यास सुरुवात झाली आहे. तुरे फूटल्याने ऊस पोकळ बनून वजन देणार नाही, अशी चिंता सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. यातच कारखान्यात ऊसतोड मजुरांच्या टंचाईची भर पडली आहे. या सगळ्यात मात्र शेतकरी भरडले जात आहे. टोळी मिळविण्यापासून ऊसतोड करेपर्यंत पैसे द्यावे लागत असल्याने शेतकरी या सर्व यंत्रणेसमोर हतबल झाले आहेत. त्यामुळे सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाली कोण, असा सवाल समोर येत आहे.

ऊसतोड द्यावी यासाठी शेतकऱ्यांकडून सध्या कारखान्याचे उंबरठे झिजविले जात आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या समस्येकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्यामुळे व्यथा मांडायची कुणाकडे, अशी दयनीय अवस्था शेतकऱ्यांची बनली आहे.

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Next Post
Cabinet Approves PAN 2.0 All You Need To Know

नवीन पॅन कार्ड क्यूआर कोडसह सुसज्ज असणार! १४३५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.