हडपसर, (पुणे) : हडपसर टर्मिनलवरून (Hadapsar Terminal)अधिकाधिक गाड्या सोडण्यासाठी रेल्वेने (Railwas) जोरदार हालचाली सुरू केल्या असून दोन ‘स्टेबलिंग लाइन’चा विस्तार करण्यात येणार आहे. या ‘स्टेबलिंग लाइन’ (stabbing line)थेट ‘घोरपडी कोच मेंटेनन्स कॉम्प्लेक्स’पर्यंत (Maintenance Complex) (जीसीएमसी) वाढविल्याने अधिक गाड्यांची ये-जा करणे तेथून शक्य होणार आहे. या विस्ताराचा पूर्व पुण्याला सर्वाधिक फायदा (East Pune will benefit) होणार असून, पुणे रेल्वे स्टेशनवरील(Pune railway station) भार कमी होण्यास मदत होणार आहे. (Hadapsar News)
धावणाऱ्या गाड्यांची संख्या वाढविण्यासाठी ‘स्टेबलिंग लाइन’ची आवश्यकता
हडपसर रेल्वे टर्मिनल सुरू होऊन दीड वर्षे झाली आहेत. या ठिकाणी सध्या तीन प्लॅटफॉर्म असून, पहिल्या टप्प्यात नांदेड आणि हैदराबाद एक्स्प्रेस येथून धावत होत्या. काही काळानंतर नांदेड एक्स्प्रेस पुणे स्टेशनवरूनच धावू लागली. त्यानंतर रेल्वेने नव्याने दोन गाड्या हडपसर टर्मिनलवरून सुरू केल्या. सध्या येथून तीन गाड्या धावत आहे. धावणाऱ्या गाड्यांची संख्या वाढविण्यासाठी ‘स्टेबलिंग लाइन’ची आवश्यकता आहे. हडपसर टर्मिनलवर रेल्वे उभ्या करण्यासाठी ५९० मीटरच्या दोन ‘स्टेबलिंग लाइन’ उभारण्यात येणार आहेत. ही लाइन ‘घोरपडी कोच मेंटेनन्स कॉम्प्लेक्स’पर्यंत वाढविल्याने पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे.
टर्मिनलवरील प्रवाशांच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली कामे सुरू आहेत. या टर्मिनलकडे भविष्यातील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे येथूनच अनेक गाड्या सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे येथील ‘स्टेबलिंग लाइन’चा विस्तार करून त्या थेट ‘घोरपडी कोच मेंटेनन्स कॉम्प्लेक्स’पर्यंत जोडल्या जाणार आहेत. त्यासाठी साधारण ९.७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
दरम्यान, पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पुणे रेल्वे विभागावर आहे. या गाड्यांच्या दुरुस्तीसाठी ‘जीसीएमसी’पर्यंत पाच ‘स्टेबलिंग लाइन’ आणि पाच ‘पीट लाइन’ तयार करण्यात आल्या आहेत. ‘स्टेबलिंग लाइन’चा उपयोग गाडी उभी करण्यासाठी आणि ‘पीट लाइन’वर गाडीच्या दुरुस्तीची कामे केली जातात.
याबाबत पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ संचलन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला म्हणाले, “हडपसर टर्मिनल येथे उभारण्यात येणाऱ्या दोन ‘स्टेबलिंग लाइन’चा विस्तार करून त्या ‘घोरपडी कोच मेंटेनन्स कॉम्प्लेक्स’पर्यंत वाढविण्यात येणार आहेत. यासाठीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आला आहे.”
Railway News : पुणे-अमरावती विशेष रेल्वेगाडी १७ एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार
Railway News : रेल्वेने पायाभूत सुविधा वाढवण्यावर दिला भर; दुहेरीकरणाची गाडी सुसाट..!