Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Railway News : हडपसर टर्मिनलचे होणार लवकरच विस्तारीकरण ; पुणे रेल्वे स्टेशनवरील भार होणार कमी..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 15 April 2023, 19:34

हडपसर, (पुणे) : हडपसर टर्मिनलवरून (Hadapsar Terminal)अधिकाधिक गाड्या सोडण्यासाठी रेल्वेने (Railwas) जोरदार हालचाली सुरू केल्या असून दोन ‘स्टेबलिंग लाइन’चा विस्तार करण्यात येणार आहे. या ‘स्टेबलिंग लाइन’ (stabbing line)थेट ‘घोरपडी कोच मेंटेनन्स कॉम्प्लेक्स’पर्यंत (Maintenance Complex) (जीसीएमसी) वाढविल्याने अधिक गाड्यांची ये-जा करणे तेथून शक्य होणार आहे. या विस्ताराचा पूर्व पुण्याला सर्वाधिक फायदा (East Pune will benefit) होणार असून, पुणे रेल्वे स्टेशनवरील(Pune railway station)  भार कमी होण्यास मदत होणार आहे. (Hadapsar News)

धावणाऱ्या गाड्यांची संख्या वाढविण्यासाठी ‘स्टेबलिंग लाइन’ची आवश्यकता

हडपसर रेल्वे टर्मिनल सुरू होऊन दीड वर्षे झाली आहेत. या ठिकाणी सध्या तीन प्लॅटफॉर्म असून, पहिल्या टप्प्यात नांदेड आणि हैदराबाद एक्स्प्रेस येथून धावत होत्या. काही काळानंतर नांदेड एक्स्प्रेस पुणे स्टेशनवरूनच धावू लागली. त्यानंतर रेल्वेने नव्याने दोन गाड्या हडपसर टर्मिनलवरून सुरू केल्या. सध्या येथून तीन गाड्या धावत आहे. धावणाऱ्या गाड्यांची संख्या वाढविण्यासाठी ‘स्टेबलिंग लाइन’ची आवश्यकता आहे. हडपसर टर्मिनलवर रेल्वे उभ्या करण्यासाठी ५९० मीटरच्या दोन ‘स्टेबलिंग लाइन’ उभारण्यात येणार आहेत. ही लाइन ‘घोरपडी कोच मेंटेनन्स कॉम्प्लेक्स’पर्यंत वाढविल्याने पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे.

टर्मिनलवरील प्रवाशांच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली कामे सुरू आहेत. या टर्मिनलकडे भविष्यातील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे येथूनच अनेक गाड्या सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे येथील ‘स्टेबलिंग लाइन’चा विस्तार करून त्या थेट ‘घोरपडी कोच मेंटेनन्स कॉम्प्लेक्स’पर्यंत जोडल्या जाणार आहेत. त्यासाठी साधारण ९.७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

 

दरम्यान, पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पुणे रेल्वे विभागावर आहे. या गाड्यांच्या दुरुस्तीसाठी ‘जीसीएमसी’पर्यंत पाच ‘स्टेबलिंग लाइन’ आणि पाच ‘पीट लाइन’ तयार करण्यात आल्या आहेत. ‘स्टेबलिंग लाइन’चा उपयोग गाडी उभी करण्यासाठी आणि ‘पीट लाइन’वर गाडीच्या दुरुस्तीची कामे केली जातात.

याबाबत पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ संचलन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला म्हणाले, “हडपसर टर्मिनल येथे उभारण्यात येणाऱ्या दोन ‘स्टेबलिंग लाइन’चा विस्तार करून त्या ‘घोरपडी कोच मेंटेनन्स कॉम्प्लेक्स’पर्यंत वाढविण्यात येणार आहेत. यासाठीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आला आहे.”

Railway News : पुणे-अमरावती विशेष रेल्‍वेगाडी १७ एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार

Railway News : रेल्वेने पायाभूत सुविधा वाढवण्यावर दिला भर; दुहेरीकरणाची गाडी सुसाट..!

Railway News : पुणे रेल्वे विभागातून धावणाऱ्या ५० गाड्यांना १५ रेल्वे स्टेशनवर नव्याने थांबे देण्यात येणार

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Rohit Pawar : तुम्ही तिला सांगितल्यावर ''ती'' कदाचित तिचं मन बदलेल, रोहित पवारांनी सांगितलं किस्सा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.