Pune पुणे : एकता व शांतता हीच खरी राष्ट्रीय एकात्मता आहे .त्यामुळे सर्वांनी बंधुभावाने राहून शांतता टिकवणे तसेच सर्व धर्म आणि संस्कृती यांचा आदर करणे गरजेचे आहे असे मत पुणे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केले . क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान व मातंग एकता आंदोलन यांच्या वतीने रविवार दि. ९ एप्रिल २०२३ रोजी, लोहियनगर, टिंबर मार्केट, याठिकाणी रोजा इफ्तार पार्टी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित संदीप कर्णिक यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. गृहराज्यमंत्री रमेश बागवे आपल्या भाषणात म्हणाले..!
हा आमचा परिसर काशेवाडी, लोहियानगर, भवानी पेठ, महात्मा फुले पेठ, मोमीनपुरा या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक गुणगोविंदाने राहत असतात. आपल्या देशाची, राज्याची संस्कृती प्रमाणे एक दुसऱ्याच्या धर्माचा अवमान होईल किंवा कोणाच्या भावना दुखवतील असे कुठलेच कृत्य येथील नागरिक कार्यकर्ते व नेते मंडळी देखील करत नाही म्हणूनच इतर कुठल्याही भागात जरी जातीय तणाव असला तरी या भागात नेहमी शांतता असते.सर्वधर्म समभाव याचा भावनेने आमचा परिसर व कार्यकर्ते काम करीत आहेत .असे ते म्हणाले .
या कार्यक्रमास ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू पुणे शहराचे बिशप थॉमस डाबरे, मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना शफी काझमी, देशातील सर्वात पहिले बालाजी मंदिराचे पुजारी महंत रामस्वरूपदास बैरागी महाराज, स्थानिक सर्व मस्जिदचे मौलाना, पुणे पोलीस दलातील झोन-१ चे उपायुक्त संदीपसिंगजी गिल, पुणे शहर पोलीस सहाय्यक आयुक्त मा. सतीशजी गोवेकर, पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे, स्थानिक आमदार मा. रवींद्र धंगेकर, माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाट, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष मंजूर भाई शेख, मेहबूब नदाफ, उस्मानशेठ तांबोळी, रौफभाई शेख, असलम पटेल, मुन्नाभाई शेख, आसिफ शेख व अनेक मान्यवर उपस्थित होते.*
कार्यक्रमाच्या आधी मुसळधार पाऊस झाला व मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर जमले होते अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील कार्यक्रमाचे निटनेटके नियोजन व उपस्थित असलेले मोठ्या संख्येने नागरिक यांचे सर्वत्र कौतुक होत होते.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, मा. नगरसेवक श्री. अविनाश रमेशदादा बागवे होते, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री यासेर बागवे, विठ्ठल थोरात, अरुण गायकवाड, दयानंद अडागळे, हुसेनभाई शेख, सुनील बावकर, संतोष खैरे, बशीरभाई शेख, जुबेर भाई दिल्लीवाले, मोहसीन शेख, खाजाभाई शेख, गुलाम भाई शेख, सुभाष तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले होते.