(Pune Crime )पुणे : कोंढव्यामधील आयपीएलच्या क्रिकेटच्या सामान्यावर सट्टा घेणार्या बुकींवर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास छापा कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 9 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 1 कॉम्पयुटर, 3 लॅपटॉप, 18 मोबाईल हॅन्डसेट, 92 हजार रूपये रोख असा एकुण 5 लाख 12 हजार रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. एकाचवेळी सट्टा घेणार्या 9 जणांना अटक झाल्याने क्रिकेट बेटिंगच्या बाजारात प्रचंड खळबळ उडाली आहे.
हेमंत रविंद्र गांधी (वय 38, रा 313, रास्ता पेठ, पुणे), अजिंक्य शामराव कोळेकर (वय 30, रा. 207, नाना पेठ, पुणे), सचिन सतीश घोडके (वय 35, रा. 36/37, रास्ता पेठ, गोखले वाडा, मदाशी गणपती जवळ), यशप्रताप मनोजकुमार सिंह (वय 22, रा. मु. पो. मानकढिया, ता. मिर्जामुराद, जि. वाराणसी, राज्य उत्तरप्रदेश), धर्मेंद्र संगमलाल यादव (वय 25, रा. मु. कुकडी, पो. कोंधीयारा, ता. करचना, जि. प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेश), रींगलं चंद्रशेखर पटेल (वय 22, रा. मोगलावीर, ता. मिर्जामुराद जि. वाराणसी, राज्य उत्तरप्रदेश), अनुराग फुलचंद यादव (वय 32, रा. मु. पो. मुंगारी, ता. कचना, जि. प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेश), इंद्रजित गोपाल मुजुमदार (वय 30, रा. मु. पो. पश्चिम पंछीबेरिया, ता. गंगानदपूर, जि. उत्तर 24 परगाणा, राज्य पश्चिम बंगाल) आणि सतीश संतोष यादव (वय 18, रा. मु. पो. पोहदार, ता. नेजा, जि. प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार….!
कोंढव्यातील ब्रम्हा आंगण बी/2, फ्लॅट नं. 6 येथे काही बुकी आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरूध्द चेन्नई सुपर किंग या क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणावर सट्टा घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार आणि युनिट-3 चे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शखाली एसीपी सुनिल पवार, व.पो.नि. बहिरट, पोलिस उपनिरीक्षक पवार, पीएसआय पाटील आणि इतर कर्मचार्यांनी शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कोंढव्यात छापा टाकला. त्यावेळी तेथे 9 जण आयपीएलच्या मॅचवर बेटिंग घेत असल्याचे आढळून आले.
अटक आरोपींपैकी काहीजण हे लोटस 365(OTUS 365) या लिंकवर आयडी तयार करून खेळणार्या ग्राहकांना देत असल्याचे निदर्शनास आले. आरोपी हेमंत गांधी हा क्रिकेट लाईव्ह अॅपवर आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेत होता. त्याच्या खिशात 92 हजार रूपये मिळून आले. त्याच्याजवळ 1 लॅपटॉप, 5 मोबाईल हॅन्डसेट आढळले इतर जण हे LOTUS 365 चे आयडी तयार करून ग्राहकांना देण्याचे काम करत होते. त्यांच्याकडे 2 लॅपटॉप, 1 कॉम्प्युटर आणि 13 मोबाईल हॅन्डसेट होते. पोलिसांनी एकुण 5 लाख 12 हजार रूपये किंमतीचा 1 कॉम्प्युटर, 3 लॅपटॉप, 18 मोबाईल असा एकुण मिळून आला. आरोपींविरूध्द कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime News : शिवाजीनगर न्यायालयात महिला वकिलास मारहाण करुन विनयभंग..!