पिंपरी -Pimpri News : पिंपरी येथील “माइंडस्पेस हॉटेल” प्रशासनाच्या” विरोधात संप पुकारलेल्या कामगाराची उपोषणाच्या ५ व्या दिवशी तब्बेत बिघडली असून कामगाराला पोलिसांच्या मदतीने वायसीएम रुग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आले आहे. (Pimpri News)
नितीन बाबुराव ढुंगव (वय- अंदाजे ४०, रा. खारळवाडी, पिंपरी) असे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील दहा ते पंधरा वर्षांपासून १२० हून अधिक कामगार “माइंडस्पेस हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (Mindspace hotels and resorts Private Limited) या संस्थेत काम करीत आहेत. तर २०२० ते २०२२ या कालावधीत देशात कोरोनाने धुमाकूळ घालता होता. त्यांमुळे ही संस्था तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली होती. लॉकडाऊन नंतर कामगारांना त्यांचे मानधन व पुन्हा कामावर रुजू होण्याबाबतचा तपशील देखील करण्यात आला होता. असे असताना देखील आज पर्यत ही संस्था पुन्हां चालु झाली नाही.
दरम्यान, कोरोनाची स्थिती आटोक्यात येऊन सर्व उद्योग व व्यवस्थापन पुन्हा पूर्वी सारखे सुरू झाले आहे. परंतु, व्यवस्थापनाकडून व मालकांकडून कर्मचाऱ्यांच्या कामाबाबतीत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसेच काम चालू होण्याची कर्मचाऱ्यांनी किती दिवस वाट पहावी? कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे व आर्थिक परिस्थितीचे संकट उभे राहिले आहे.
कर्मचाऱ्यांवरती कुटुंबातील चार ते पाच लोकांची जबाबदारी आहे. वेतन न मिळाल्यामुळे वाढलेले कर्ज, आई वडिलांच्या दवाखान्याचा खर्च मुलांच्या शाळेचा खर्च अशा गोष्टींमुळे कर्मचारीवर्ग मानसिक तणावा खाली गेला आहे. कामाचा मोबदला मिळावा यासाठी सर्व कामगार प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान, कामगारांनी याप्रकरणी “माइंडस्पेस हॉटेल्सचे मालकांस संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले माही. म्हणून कामगारांनी आयुक्त कार्यालय वाकडेवाडी पुणे, इथे लिखित तक्रारी केल्या. परंतु तिथेही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मालकांस वारवार विनंती करून देखील मालक कोणतेही उत्तर देत नाही, तसेच मालकाने विक्रेता लोकांचे पैसे दिले आहेत.
कंपनीतील १२० कामगार लोकांचे ग्रॅच्युइटी, कामगारांचा Leave lencashment, PF न अदा केलेले पैसे, कामगारांना त्यांच्या उर्वरित आयुष्याचा मोबदला, हे पैसे देणे बाकी आहेत, यामुळे सर्व कामगार खूप त्रासलेले होते. व कामगारांनी “माइंडस्पेस हॉटेल्स प्रशासनाच्या” विरोधात उपोषणाचा मार्ग निवडला. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी महानगरपालिका समोर आमरण उपोषण सुरु केले. उपोषणाच्या पाचव्या दिवशी नितीन ढुंगव यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना आकुर्डी येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलां आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
याबाबत बोलताना नितीन ढुंगव म्हणाले की, “माइंडस्पेस हॉटेल्सने दिलेल्या त्रासाला कंटाळून सर्व कामगार आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहोत, कामगारांपैकी जर कोणी आत्महत्या केलीच तर त्या आत्महतेस पुर्णपणे आशिष भांडारी प्रशांत भंडारी व केतन टक्कर हे असतील. तसेच येत्या पंधरा दिवसात याचा निकाल पोलिस व इतर यंत्रनेने द्यावा. असे उपोषण कर्त्ये नितीन ढुंगव यांनी सांगितले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :