Crime News | लोणी काळभोर : लोणीकंद (ता. हवेली) येथील मटका जुगाराच्या अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा टाकून तब्बल २३ जणांना सोमवारी (ता.३) ताब्यात घेतले आहे. तर ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी केलेल्या या कारवाईमुळे दोन नंबर वाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नगर रस्त्यावरील लोणीकंद (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील केसनंद फाटा चौकाजवळ पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांची धडाकेबाज कामगिरी सुरुच…
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, तेव्हा त्या ठिकाणी काही इसम बेकायदेशीर मटका जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आले. याप्रकरणी पोलिसांनी २३ इसमांना ताब्यात घेतले आहे. तर तेथून मटका जुगारातील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकुण ५४ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या २३ जणांवर लोणी कंद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी कंद पोलीस करीत आहेत.
हि कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, अमित जमदाडे आणि किशोर भुजबळ यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!