MPSC पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ( एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा सुरळीत पार पडावेत. तसेच राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाची दखल घेत आयोगाने मागणी मान्य करत नोटीफिकेशन काढले होते. तसे एमपीएससीचे विद्यार्थी आणि आंदोलन हे काय आता वेगळे राहिलेले नाही. कोणतीही मागणी मान्य करुन घेण्यासाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून रस्त्यावर उतरावे लागून आंदोलन करणे हे जणू समीकरण बनले आहे.
एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर…!
आता एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. येत्या 30 एप्रिलला मोठ्या पदांसाठी परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आंदोलनाला बसल्याने पुन्हा एकदा काळजी व्यक्त केली जात आहे.
टायपिंग स्किल टेस्टमध्ये आचानक बदल केल्याने विद्यार्थ्यांनी पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात हे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. टायपिंग स्किल टेस्टमध्ये अचानक बदल केल्याचा आरोप यावेळी विद्यार्थींनी केला आहे. मात्र टायपिंग स्किल टेस्ट नियमानुसार करण्याची मागणी विद्यार्थींकडून केली जात आहे. यासाठी पुण्यात स्पर्धा परिक्षचे विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
लिपिक टंकलेखक आणि कर सहायक्क कौशल्य चाचणी बाबत हे आंदोलन करण्यात आले आहे. टायपिंग स्किल टेस्ट ही राज्य परीक्षा परिषद यांच्या नियमानुसार केली पाहिजे. मात्र त्यात बदल केल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. तसेच मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा विद्यार्थींनी दिली आहे.