पुणे : Girish Bapat News – खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजारामुळेआज बुधवारी (29 मार्च) निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच इतरही समाजिसक संस्था, संघटनांनी बापट (Girish Bapat News) यांना श्रध्दांजली वाहण्यात येत आहे. (Girish Bapat News)
रिक्षा चालक कष्टकऱ्यांची पुणे शहराचे खासदार गिरीश भाऊ बापट यांना भावपूर्वक आदरांजली
पुण्याचे खासदार गिरीष बापट यांनी फक्त राजकारणच नाही तर समाजकारण ही केले. ते कष्टकऱ्यांचे नेते होते. रिक्षा चालक कष्टकरी गोरगरीब कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधान भवनात आवाज उठवला. तर ”ये रिक्षावाला नाही तर अहो रिक्षावाले म्हणा” ; ही संस्कृती गिरीश बापट यांनी रुजवली. अशी आठवण महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितली.
अहोरात्र रिक्षा चालकांची बाजू बापट यांनी लावून धरली. तसेच त्यांना त्यांना न्याय मिळवून दिला. कोविड काळामध्ये रिक्षा चालकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी रिक्षा चालकांसोबत आरटीओच्या समोर आंदोलन केले. नेहमीच रिक्षा चालकांची, कष्टकऱ्यांची बाजू लावून धरून त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे काम खासदार गिरीश बापट यांनी केले.
गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्षा चालक कष्टकऱ्यांचे फार मोठे हानी झाली असून आमचा आधारवड आणि हक्काचा माणूस हरपला अशा शब्दात कांबळे यांनी बापट यांना श्रध्दांजली वाहिली. रिक्षा चालकांच्या व कष्टकऱ्यांच्यामध्ये शोक काळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.