Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pandharpur News : घरात पडला अचानक ३० फुट भलामोठा खड्डा ; त्यात एकापाठोपाठ पडल्या ३ महिला ; साडीच्या गाठी बांधत तिन्ही महिला सुखरूप बाहेर..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 29 March 2023, 18:37

पंढरपूर : Pandharpur News – घराला अचानक तब्बल ३० ते ३५ फुटाचा खड्डा पडून त्या खड्ड्यात एकापाठोपाठ ३ महिला पडल्याची धक्कादायक घटना पंढरपूर (Pandharpur) शहरातील कोळी गल्ली परिसरात मंगळवारी (ता.२८) दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने आजूबाजूच्या नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत साडीच्या गाठी बांधत तिन्ही महिलांना सुखरूप बाहेर काढले आहे. (Pandharpur News)

पंढरपूर शहरातील कोळी गल्लीतील राहुल शिंदे यांच्या घराला पडला खड्डा  

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहरातील कोळी गल्ली परिसरातील राहुल शिंदे राहतात. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या घरातील फरशी खाली आली. राहुल यांच्या कुटुंबातील एक महिला या खड्ड्यात पडल्यानंतर ती ओरडू लागली. तिच्या ओरडण्याने शेजारील एक महिला काय झालं आहे, हे पाहण्यासाठी आली. आणि तिलाही या खड्ड्याचा अंदाज न आल्याने तीदेखील खाली पडली. राहुल शिंदे यांची वृद्ध आई देखील या खड्ड्यात पडली. तीन महिला एकापाठोपाठ खड्ड्यात पडल्याने कोळी गल्लीत एकच गोंधळ उडाला होता.

 

आजूबाजूच्या नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून या खड्ड्यात उतरले आणि त्यांनी साड्यांच्या गाठी बांधत या महिलांना खड्ड्यातून बाहेर काढले. या खोल खड्ड्यात महिला पडल्या तेथे पाणी होते, वरून दगड-माती पडत असल्याने त्यांना तातडीने वाचवणे गरजेचे होते. अशातच स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत या खोल खड्ड्यात उतरून महिलांना बाहेर काढले. खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर या तिन्ही महिलांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, पावसाळ्यात पंढरपूर शहरात नदीचे पाणी शिरते. वारंवार येणाऱ्या पुरामुळे या ठिकाणची जमीन गाळाची व भुसभुशीत बनल्याने असे खड्डे पडत असल्याचा अंदाज नागरिक व्यक्त करत होते. सुदैवाने ही घटना मंगळवारी दिवसा घडल्याने त्यांना तात्काळ मदत मिळाली. रात्री झोपेत असताना ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. पंढरपूर शहरातील अशा धोकादायक झालेल्या इमारतींची तपासणी प्रशासनाने हाती घेणे गरजेचे आहे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कारण पंढरपुरातील अशा अनेक घरांमध्ये वारकरी वास्तव्याला उतरतात, त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48
Next Post

Girish Bapat News : ''ये रिक्षावाला नाही तर अहो रिक्षावाले म्हणा'' ; ही संस्कृती गिरीश बापट यांनी रुजवली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.