Crime News | पुणे : पुणे शहरासह परिसरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरींच्या या घटनांमुळे पुणेकर हैराण झाले आहे तर पोलीस प्रशासन परेशान झाले आहे. अशातच बोटक्लब रस्त्यावरील बंद रुग्णालय फोडून चोरट्यांनी गल्ल्यातील ५ हजारांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात ६१ वर्षीय डॉक्टरांनी तक्रार दिली आहे. त्यावरून दोन ते तीन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचा एंजेल क्लिनिक या नावाने रुग्णालय आहे. त्यांचे रुग्णालय बंद असताना बालकनीतील दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.
तसेच, ड्राव्हरचे लॉक कशाच्या तरी सहाय्याने तोडून गल्ल्यातील ५ हजारांची रोकड चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची महिती दिली. त्यानूसार, पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Indapur News |डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी मखरे