Arrested | शिरूर, (पुणे) : रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनेसांगवी येथील किराणा दुकानातून ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरी करून फरार असलेल्या आरोपीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
विजय लक्ष्मण गलांडे (वय -३१रा. सासवड रोड, गोंधळेनगर, हडपसर, पुणे सध्या रा. पेरणेफाटा, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनेसांगवी (ता. शिरुर) येथे रविंद्र गंगाराम डांगे यांचे जय मल्हार ट्रेडर्स नावाच्या किरणा दुकान असुन रविवारी (ता. १९) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटुन दुकानातील साहित्य व रोख रक्कम असा ६५ हजार ५०० रुपयांचा किराणा माल चोरुन नेल्याबाबत तक्रार दिली होती.
पोलिसांनी ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…
सदर घटनेचा तपास पोलीस करीत असताना सीसीटीव्ही कॅमेरेच्या सहाय्याने सुरुवात केली. त्यानुसार एका गाडीच्या संशयावरून सदरचा गुन्हा हा विजय लक्ष्मण गलांडे याने केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस पथकाने आरोपी विजय गलांडे याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, बारामतीचे अप्पर पोलिस अधिक्षक मितेश मिट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार वैभव मोरे, विलास आंबेकर यांनी केली असुन या गुन्हयाचा पुढील तपास दत्तात्रय शिंदे हे करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Baramati Crime : हातपाय बांधलेल्या अवस्थेत ५० वर्षीय व्यक्तीचा विहरीत आढळला मृतदेह ; परिसरात खळबळ