Pune | पुणे : मुस्लिम धर्मीयांचा रमजान महिना सुरू झाल्याने इफ्तारसाठी बाजारात रसदार फळांना मागणी वाढली आहे. कलिंगड, खरबूज, अननस, पपई या फळांच्या मागणीत चांगली वाढ झाली आहे. तसेच बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने डाळिंबाच्या भावात १० टक्क्यांनी घट झाली.
रमजान महिना सुरू झाल्याने इफ्तारसाठी बाजारात रसदार फळांना मागणी वाढली….
रविवारी (ता. २६) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस ६ ट्रक, संत्री ५० ते ६० टन, मोसंबी ३५ ते ४० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई १० ते १५ टेम्पो, लिंबांची सुमारे एक हजार ते बाराशे गोणी, कलिंगड ५० ते ६० टन, खरबूज २० ते ३० टन, पेरू २० ते २५ क्रेट्स, चिक्कू एक ते दीड टन, हापूस आंबा ७ ते ८ हजार पेटी, पपई १५ ते २० टन, पेरू आवक ३ ते ५ टन इतकी आवक झाली.
तर आवक कमी लिंबाच्या भावात गोनिमागे २०० ते २५० रूपयांनी वाढ झाली होती. इतर सर्वप्रकारच्या फळांचे भाव स्थिर होते.
फळांचे भाव…
लिंबे (प्रतिगोणी) : १०००-२०००, मोसंबी : (३ डझन) :२२० -४००, ( ४ डझन) : १०० -२२०, संत्रा : (१० किलो) : ३०० -८००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५० -१८०, गणेश : १० -५०, आरक्ता ३० -६०, कलिंगड : ८ -१४, खरबूज : २२ -२५ , पपई : १२ -३०, अननस (एक डझन) : १०० ते ६००, पेरू (वीस किलो ) : १००० -१२००, चिक्कू (दहा किलो ) : २०० -५००, आंबा -रत्नागिरी हापूस कच्चा ४ ते ७ डझन –२००० ते ३५०० रुपये, ५ ते ९ डझन २५०० ते ४५०० रुपये.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Baramati News : डेंग्यूमुळे बारामतीच्या महिला पोलिसाचा मृत्यू ; अनाथ झाले १० दिवसाचे बाळ