Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News | उरुळी कांचन येथील वीज कर्मचाऱ्याचा प्रताप..! वीजमीटर परस्पर दिला दुसऱ्याला वापरायला ; वीजबिलाचा भुर्दंड मात्र मूळ मालकालाच, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ऑनलाईन तक्रार दाखल..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 March 2023, 13:24

Uruli Kanchan News | उरुळी कांचन, (पुणे) : वीज बिलातील चुकांच्या बाबतीत विक्रमावर विक्रम करीत असलेल्या महावितरण कंपनीचा नवीन प्रताप पुढे आला आहे. उरुळी कांचन परिसरातील एका वायरमनने घरात कोणी राहत नसल्याची संधी साधत सदनिकेतील मीटर काढून परस्पर दुसऱ्याला दिल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

याबाबत घरमालक केतन दिलीप शाह (रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली मूळ रा. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ऑनलाईन तक्रार दिली आहे. तसेच रास्तापेठ येथील महावितरण मुख्य कार्यालय या ठिकाणी तक्रार दिली आहे. तरीही लोणी काळभोर पोलीस व महावितरणच्या अधिकाऱ्याकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

सदरची सदनिका बंद …

मिळालेल्या माहितीनुसार, केतन दिलीप शाह यांची कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील गगन आकांक्षा इमारतीत एक सदनिका आहे. सुरुवातीला त्या ठिकाणी शाह राहत होते. मुलाचे शिक्षक झाल्याने सदरची सदनिका बंद होती. मात्र वीजमीटर सुरु होते. त्यामुळे महिन्याला येणारे ११० रुपयांचे वीजबिल ते भरीत होते.

 

मागील तीन महिन्यांपूर्वी ५ हजार एवढे लाईट बिल आले त्यावेळेस त्यांनी ते भरले. मात्र पुन्हा तीन महिन्यांनी सदरचे लाईटबिल हे ७ हजार रुपये आल्याने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी वीजमीटर मिळून आला नाही. वीज मीटरचे बिलिंग सायकल मासिक बदलल्याने वीज बिल तीन महिन्यांनी मिळाले. तांत्रिक विश्लेश्नाद्वारे तपास केला असता सदरचा मीटर हा साडे तीन किलोमीटर अंतरावर मिळून आला. याबाबत एका वायरमनला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच वीजमीटर हा कार्यालयात असल्याची माहिती दिली.

याबाबत केतन शाह यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात व रास्तापेठ येथील महावितरण मुख्य कार्यालय या ठिकाणी तक्रार दिली आहे. मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

याबाबत शहा व त्यांचे सहकारी उरुळी कांचन कार्यालयातील सहायक अभियंता संजय पोफळे यांच्याकडे तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोफळे यांनी त्यांना  उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच उरुळी कांचन परिसरात एखाद्या तक्रार सांगितली असता ते काम माझे नाही ते काम वरिष्ठांचे असल्याची बतावणी करून वेळ मारून नेत असल्याच्याही अनेक तक्रारी नागरिकांनीही केल्या आहेत.

याबाबत बोलताना उरुळी कांचन येथील सहायक अभियंता संजय पोफळे म्हणाले, माझ्या अखत्यारीत उरुळी कांचन, शिंदवणे, व वळती हि गावे आहेत. कोरेगाव मूळचा भाग माझ्याकडे नसून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे आहे. त्यामुळे सदर घटनेची माहिती हि तेथील अधिकारी देतील.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Uruli kanchan Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू ; उरुळी कांचन जवळील इमानदार वस्तीजवळ झाला होता अपघात

Uruli Kanchan News | पूर्व हवेलीतील हिंगणगावचा शेतकरी पुत्र किरण पोपळघट बनला DYSP

Pune PMC News | उरूळी देवाची- फुरसुंगी गावांसाठी निधी नाहीच ; स्वतंत्र नगरपालिका करण्याची प्रक्रियाही रखडली

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55
Next Post

Pune | रसदार फळे महागली, फळांच्या भावात 'एवढ्या' टक्क्यांनी वाढ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.