Health Care | सफरचंदामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ही खनिजे तर ‘अ’, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्वे असतात. तसेच तंतुमय भाग, प्रथिने व आद्र्रता हे घटकही असतात. १०० ग्रॅम सफरचंदात फक्त ५० कॅलरीज आढळतात. ज्यामध्ये साखर १९ ग्रॅम आणि फायबरचे प्रमाण सुमारे ३ ग्रॅम असते. इतर फळांमध्ये आढळणाऱ्या फ्रक्टोजपेक्षा हे प्रमाण कमी असते. जाणून घ्या सफरचंद ज्यूस पिण्याचे फायदे –
१. सफरचंदांमध्ये भरपूर फायबर असते. जे चयापचय वाढवण्याबरोबरच पचनक्रिया बरोबर ठेवते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. तसेच फायबर तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले ठेवते. सफरचंद ज्यूसचे सेवन केल्याने शरीरातील चरबी विशेषतः पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
२. सफरचंद ज्यूस रोज प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. यामुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहते. सफरचंद ज्यूस प्यायल्याने शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि डिटॉक्सिफायर म्हणून काम करतात.
३. सफरचंद ज्यूसमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करू शकतात. त्यामुळे हृद्य निरोगी राहते.
४. सफरचंद ज्यूसमध्ये जीवनसत्त्वे सी आणि ई, जस्त, तांबे यांसारखी खनिजे असतात, जी डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
५. रोजच्या आहारात सफरचंद ज्यूसचा समावेश करा .सफरचंदात फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक ॲसिड असतात. जे ताण-तणाव कमी करतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Health Care | ‘या’ घरगुती उपायांनी घालवा टाचदुखी
Health News : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आमचूर पावडर उपयोगी