Loni Kalbhor News | लोणी काळभोर : नव तंत्रज्ञान, इनोव्हेशन आणि संशोधनाला सद्याच्या विशेष महत्व आले आहे. भारतात संशोधनासाठी वातावरण निर्मिती होत असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन जगाला फायदा होईल. असे सर्वसमावेशक इनोव्हेशन व तंत्रज्ञान निर्मितीसाठी संशोधन करावे. असे मत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे (MCCIA) महासंचालक प्रशांत गिरबने यांनी व्यक्त केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) (Loni Kalbhor) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, आयएसडीसी, क्रिडाई, एमआयटी अटल इनोव्हेशन सेंटर आणि एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटतर्फे आयोजित ग्लोबल इनोव्हेटिव्ह ट्रेंड या विषयावरील पाचव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी कल्याणी सेंटर ऑफ टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन (KCTI) – भारत फोर्जचे वरिष्ठ संचालक डॉ. राजकुमार प्रसाद सिंग, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. सुनीता मंगेश कराड, अटल इनोव्हेश सेंटर आणि विद्यापीठाच्या संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. मोहित दुबे, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. रजनीशकौर बेदी, डॉ. सुदर्शन सानप यांच्यासह अन्य विभागाचे डीन, डायरेक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते.
इनोव्हेशन हे सर्वसमावेशक असावा – मराठा चेंबरचे संचालक प्रशांत गिरबने यांचे मत…
प्रशांत गिरबने म्हणाले, बहुतांश तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन होत आहे, मात्र हे पूर्ण नाही. संशोधक स्टीव जॉब म्हणतात, संशोधन हे तंत्रज्ञान आणि कला या क्षेत्राशी जोडले गेले आहे. विद्यापीठाने संशोधनाकडे अधिक लक्ष दयावे. संशोधन ही कलात्मकता आहे. तंत्रज्ञानात्मक संशोधनात कलेचा उपयोग केला जातो. सध्याला युवक डिजिटल वर्ल्ड विषयी चर्चा करतात.
युपीआयच्या माध्यमातून भारत डिजिटल पेमेंटशी जोडला गेला आहे. नंदन निलकेणी यांनी हे संशोधन केले आहे. डिजिटल पेमेंटसंदर्भात जग आत भारताकडे पाहत आहे. पुढच्या पाच वर्षात ई-कॉमर्सचा वापर वाढेल. संशोधनामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा महत्वाचा सहभाग आहे. भविष्यात हायड्रोजन इंधनचा वापर वाढेल. सध्याला आपली ऊर्जा काही क्षेत्रात निर्भर आहे. हायड्रोजन इंधनात जगाला बदलून टाकण्याची क्षमता आहे.
डॉ. राजकुमार प्रसाद सिंग म्हणाले, विद्यार्थ्यांची कोणत्याही क्षेत्रातील पदवी ही तेव्हाच कामाला येईल जेव्हा ते या क्षेत्रात एखादे संशोधन करातील. संशोधनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नलमध्ये भारतीयांचे संशोधनात्मक पेपर छापले जावे.
पेटंटसंबंधी भारतीयांध्ये सकारात्मकता दिसून येते नाही, मात्र पेटंट घेणे आवश्यक आहे. पीएचडी संदर्भात विद्यार्थ्यांनी संशोधनावरील आपले लेख चांगल्या पब्लिकेशनमध्ये प्रकाशित करावे. राष्ट्रीय स्तरावरील संशोधन लॅब असावी. पंतप्रधान फेलोसिपचा वापर करावा संशोधनासाठी विद्यार्थ्यांना करावा.
सुनीता कराड म्हणाल्या, की एमआयटी एडीटी विद्यापीठ संशोधनाला विशेष महत्व देत आहे. संशोधनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. भारत हा जगातील पाच सगळ्यात मोठा स्टार्ट अप सुरू करणारा देश ठरला आहे. परदेशी विद्यापीठ भारतात गुंतवणूक करत आहेत. विद्यार्थ्यांसाठी संशोधन, उद्योजकता आणि संशोधनात्मक वातावरण तयार करावे.
दरम्यान अभिवृद्धी जर्नलचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. मिलिंद दुबे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक घुगे आणि प्रा. स्नेहा वाघटकर यांनी केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
पुण्यातील MIT च्या विद्यार्थ्यांची नारायणपूर येथे गाडी पलटली ; दोघांचा मृत्यू तर ५ जण जखमी..!