Arrested | पुणे : शेती उपयोगी साहित्याची दुकाने फोडून चोरी करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल साडे ११ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सुभाष भोराजी दुधवडे (वय २७) गजानन धावजी दुधवडे (वय ४७, दोघे रा. पारदरा, वारणवाडी पोखरीता पारनेर जि अहमदनगर), अजय रंगनाथ वाघ (वय २६ , रा. गुरेवाडी, म्हसोबा झाप ता. पारनेर जि अहमदनगर), सोन्याबापू गेणभाऊ मधे (वय-२३) आणि भाऊसाहेब रावसाहेब दुधवडे (वय २८ खंदरमाळ, माळवदवाडी ता संगमनेर जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
साडे ११ लाखाचा मुद्देमाल जप्त…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाणबुडी मोटार, बोअर मोटार, मल्चिंग पेपर इत्यादी शेती उपयोगी साहीत्याची दोन दुकाने फोडून चोरी केल्याच्या दोन घटना मागील महिन्यात घडल्या होत्या. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शेती साहित्याचे दुकानामध्ये चोरी झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्वतः लक्ष दिले होते. व सदरचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना पकडण्याच्या पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी जुन्नर विभागात काम करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व त्यांच्या पथकाला सूचना दिल्या
होत्या.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जुन्नर विभागात तपास करीत होते. तपास करीत असताना पोलिसांना सदर गुन्हा हा पोखरी पारनेर परीसरातील इसमांनी केला असून त्यांच्याकडे बोलेरो व पिकअप वाहन असून त्यांनी गुन्हे करतेवेळी सदरची वाहने वापरली आहेत. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी वरील पाच आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपीकडून गुन्हयात चोरी गेलेला मल्चिंग पेपर, बोअर मोटार, पाणबुडी मोटार, शेती पंप असा मुद्देमाल तसेच चोरी करण्यासाठी वापरलेली पिकअप गाड़ी व बोलेरो गाडी असा एकूण साडे अकरा लाख रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलां आहे. आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार तुषार पदारे, पोलीस हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकौर, मंगेश थिगळे, राजू मोमण, जनार्दन शेळके, संदिप वारे, अक्षय नवले, दगद विरकर आणि अक्षय सुपे यांच्या पथकाने केली आहे.