मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधल्या मैत्री या निवासस्थानी ईडीची टीम दाखल झाली आहे. आणि त्यांची ईडीकडून चौकशी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. आता आज केवळ चौकशी होणार, की ईडीकडून त्यांना अटक होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
संजय राऊत यांना ईडीने याअगोदर पत्राचाळ प्रकरणामध्ये चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने त्यांना अनेकवेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यांनी चौकशीसाठी सहकार्य न केल्याने ईडीचे पथक त्यांच्या घरी दाखल झाले आहे.
दरम्यान, राऊतांच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे. तसेच सीआय एसचे तीन कर्मचारी संजय राऊत यांच्या घराबाहेर गेट वरती आहेत. संजय राऊत आपल्या परिवारासह घरातच असल्याची माहिती आहे. आणि ईडीकडून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. आता ईडी फक्त चौकशी करणार की, अटक करणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.