Pune News पुणे (मंचर) : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. मागे एकदा ”सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय” गाणे चांगलेच प्रसिध्द झाले होते. त्यामुळे सोनू आपल्याला नवीन नाही. अशीच एक सोनू आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पुणे तालुक्यातील( Pune News) मंचर येथील पशुपालक शेतकरी गणेश खानदेशे यांनी खरेदी केलेल्या डेन्मार्क जातीच्या ‘सोनू’ गाईची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
चाळीस लिटर दूध देणारी ही गाय 2 लाख 51 हजार रुपयांना खानदेशे यांनी खरेदी केली आहे. या गाईचे सध्या सोशल मीडियावर कौतुक सुरू असून, हजारोंनी या गाईचे फोटो, व्हिडीओ, व्हायरल होत असल्याने सोशल मीडियावर सोनू गाय स्टार झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील प्रगतशील शेतकरी संजय सालगुडे पाटील यांच्याकडून खानदेशे यांनी ही गाय विकत घेतली आहे. खानदेशे हे पुणे डेरी फार्मस असोशिएशनचे समन्वयक आहेत.
सोनू गाईचे वैशिष्ट्ये…!
– वय पाच वर्षे
– वजन साडेआठ क्विंटल
– उंची सहा फूट
– लांबी आठ फूट
– तर दूध देण्याची क्षमता-चाळीस लिटर आहे.
नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली,सोलापूर, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, इत्यादी भागांतील शेतकरी ही गाय पाहण्यासाठी येत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Kunjirwadi News | कुंजीरवाडी येथील कलावती दानवले यांचे निधन!
Pune Crime News | पुणे : चायनिज सेंटर चालकांमध्ये वाद; लोखंडी रॉडने मारहाण!
Pune News : आजीची चेन चोरणाऱ्या चोरट्याला नातीने दाखवला इंगा ; १० वर्षीय नातीचं सर्वत्र कौतुक..!