राजेंद्रकुमार शेळके
(Hadapsar News) हडपसर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी, हडपसर (Hadapsar) महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. “सरव्हायकल कॅन्सर” (Cervical Cancer) या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य अश्विनी शेवाळे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रियंका दंडुके, वैशाली खेंग्रे, प्रिया सॉफ्ट टचच्या डायरेक्टर
कोमल लोणकर यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले.
“सरव्हायकल कॅन्सर” विषयी विद्यार्थांना माहिती..!
“सरव्हायकल कॅन्सर” (Cervical Cancer) काय आहे, तो कोणत्या भागात होतो त्याची लक्षणे काय असतात, त्याचे निदान आणि उपचार यावर थोडक्यात माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली. सरव्हायकल कॅन्सर हा सर्वात सामान्य विकार आहे, नियमित तपासणी व सकारात्मक दृष्टिकोनातून प्रतिबंधित केला जाऊ शकतो तसेच जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा असेही मार्गदर्शन करण्यात आले.
दैनंदिन जीवनातून महिलांनी स्वतःला थोडा वेळ दिला पाहिजे. कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये तग धरण्यासाठी त्यांनी स्वतःला शारीरिक व बौद्धिक सक्षम बनवले पाहिजे. महिला निरोगी राहतील, तेव्हाच संपूर्ण घर निरोगी राहणार आहे, प्राचार्य शेवाळे यांनी सांगितले.
माधुरी शिर्के व सांस्कृतिक विभाग प्रमुख अश्विनी भोसले यांनी सूत्रसंचालन केले. पल्लवी मोरे यांनी आभार मानले.
या संदर्भातील अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Hadapsar Good News : हडपसर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्स्प्रेस सहआणखी चार एक्स्प्रेसना थांबा..!
पुण्यातील सिंहगड कॉलेजमधील विद्यार्थाचा आईच्या डोळ्यादेखत धावत्या रेल्वेमधून पडून मृत्यू..!