लहू चव्हाण
पाचगणी : महिला सक्षम होऊन त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहाव्यात, त्यांनी आपला संसार व्यवस्थित चालवावा, त्यांना आर्थिक चणचण भासू नये यासाठी नॅशनल फॅशन स्कूलने घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी केले.
शाहूनगर, पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथे नॅशनल फॅशन स्कूलच्या वतीने मोफत टेलरिंग कोर्सच्या शुभारंभ प्रसंगी राजपुरे बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्षा अनिता चोपडे, माजी उपनगराध्यक्षा सुलभा लोखंडे, नॅशनल फॅशन स्कूलचे संचालक महादेव भिलारे, खिंगरचे उपसरपंच विठ्ठल दुधाणे, अश्वटेक ॲकिडमीचे संचालक सुरेश मालुसरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गोळे, दत्तात्रय कंळबे महाराज पतसंस्थेचे संचालक विजय रांजणे,अनिल (नाना) रांजणे, ग्रामसेवक वैभव काळे, राजपुरीचे माजी पोलीस पाटील अशोक राजपुरे, विश्वास राजपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
राजपुरे पुढे म्हणाले शहरातील मुली व महिलांच्या हाताला काम मिळावे, हातावरील पोट असलेल्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी हे प्रशिक्षण मोलाचे ठरणार आहे. कमवा आणि शिका या योजनेंतर्गत फॅन्सी कपडे कटींग शिकवले जाणार शिक्षण पूर्ण झाल्यावर शासन मान्यताप्राप्त सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.त्याच बरोबर क्लास पुर्ण झाल्यावर रोजगारही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्कूलचे संचालक महादेव भिलारे यांनी सांगितले.