राहुलकुमार अवचट
यवत : (ता. दौंड) येथील श्री साई चरण सेवा मंडळ यांच्या साई पादुकांचा महाशिवरात्री उत्सव सालाबाद प्रमाणे मंडळाचे विश्वस्त पद्मा पवार व ज्येष्ठ साईभक्त बजरंग पवार यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता श्री साई पादुकांचे आगमन झाले. रात्री १० वा शेजारती करण्यात आलीतर पहाटे ५ वाजता भूपाळी व काकड आरती करण्यात आली. सकाळी ८ ते ११ या वेळेत श्री साई पादुकांना रुद्राभिषेक व माध्यान आरती करण्यात आली.
दुपारी संत सावतामाळी भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
त्यानंतर सायंकाळी सात वाजता श्री साईंची धुपारती जिल्हा परिषद माजी सदस्य गणेश कदम यांच्या हस्ते संपन्न झाली. आरती नंतर भाविक भक्तांना फराळाची वाटप करण्यात आले. यावेळी श्री साई पादुकांना आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
यावेळी श्री साई चरण सेवा मंडळाचे दिलीप यादव, विजय दोरगे, निलेश शेंडगे, नाना मिसाळ, शैलेश गुंजभारे, मयूर वचकल, सनी शहा , गौरव पटवा यांसह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते