Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लग्नाला १ महिन्याचा अवधी शिल्लक असतानाच माथेफिरूने भावी पत्नीवरच बलात्कार करून केला खून ; मग संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी माथेफिरूच्या आईवडिलांसह नातेवाइकांना घरात डांबले…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 19 February 2023, 10:38

जालना – लग्नाला १ महिन्याचा कालावधी शिल्लक असतानाच एका माथेफिरूने होणाऱ्या पत्नीवर बलात्कार करून खून केल्याची धक्कादायक घटना बेलोरा (ता. मंठा, जि. जालना) गावात शनिवारी (ता.१८) दुपारच्या सुमारास घडली आहे. संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी माथेफिरूच्या आईवडिलांसह नातेवाइकांना घरात डांबून ठेवले होते. या घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

दीप्ती उर्फ सपना संदीप जाधव (वय-१७, बेलोरा, ता. मंठा, जि. जालना) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर सुशील सुभाष पवार (रा. वरुड, ता. मेहकर, जि.बुलढाणा) असे सावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप्ती उर्फ सपना जाधव व सुशील पवार या दोघांचा १७ मार्च २०२३ रोजी विवाह ठरला होता. दोन्ही कुटुंबामध्ये लग्नाची लगबग सुरु होती.शनिवारी वधू आणि वर या पक्षांकडील मंडळी दुसर बीड येथे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गेले होते. यावेळी सुशीलही बस्त्यासाठी नातेवाइकांसोबत आला होता. मात्र, तो तेथून अचानक गायब झाला.

 

सुशीलने थेट भावी पत्नीचे बेलोरा गाव गाठले. कुटुंबीय बस्त्यासाठी गेल्याने घरी भावी नवरी दीप्ती ही एकटीच होती. सुशीलने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. तिने विरोध केला असता, त्याने धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. दरम्यान, घटनास्थळी गावातील लोक जमा होताच आरोपी सुशील फरार झाला.

या घटनेची माहिती मिळताच, परतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, सेवली ठाण्याचे सहायक निरीक्षक नित्यानंद उबाळे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह तातडीने शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

दरम्यान, घटनास्थळी ग्रामस्थ आक्रमक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपी सुशील पवार यास अटक करण्याच्या मागणीसाठी जमावाने तरुणाच्या आईवडिलांसह नातेवाइकांना एका घरात कोंडले होते. तर या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18
Next Post

कष्टकरी शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू - जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.