पुणे : अनेक वादविवाद झाल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला असून त्यांना पदमुक्त केले आहे. कोश्यारी यांच्या जागी छत्तीसगडचे रमेश बैस यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे.
Ramesh Bais appointed as the new Governor of Maharashtra; President of India has accepted the resignation of Bhagat Singh Koshyari as Governor of Maharashtra. pic.twitter.com/9mco3tSTkI
— ANI (@ANI) February 12, 2023
रमेश बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ साली झाला असून त्यांनी नगरपालिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मध्यप्रदेशमध्ये १९८० ते ८४ दरम्यान आमदारकी देखील मिळविली होती. त्यानंतर छत्तीसगडच्या रायपूर लोकसभा मतदारसंघातून सात वेळा नेतृत्व केले आहे.
यावेळी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाचा देखील कार्यभार सांभाळला असून यापूर्वी ते त्रिपुरा व झारखंड या दोन राज्यांचे राज्यपाल पद देखील भूषविले आहे.