पुणे : वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला उच्च न्यायालयाने तब्बल 9 वर्षानी जामीन मंजूर केला आहे. ए. एस. किलोर यांच्या कोर्टाने आरोपीस जामीन मंजूर केला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली. योगेश प्रल्हाद अडसूळ असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मित्राने फिर्यादीच्या मुलीची छेड काढली होती. त्यानंतर फिर्यादीचे मयत पती यांनी त्याबाबत आरोपीच्या मित्राला समज दिली होती. त्याचा राग मनात धरून 26 एप्रिल 2015 रोजी आरोपी योगेश याचे सह इतर 5 जणांनी फिर्यादीचे पती कामावर गेले असताआरोपींनी त्या ठिकाणी जाऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी योगेश अडसूळ याने तेथे पडलेला सिमेंटचा गट्टू मारल्याने फिर्यादीच्या पतीचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी वानवडी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान आरोपींना अटक केली. आरोपींच्या विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. आरोपी येरवडा कारागृहात असताना आरोपी योगेश याने अॅड. नितीन भालेराव व यांच्या अॅड.विवेक आरोटे यांच्या द्वारे उच्च न्यायालयात आरोपीचा जमिनअर्ज दाखल केला होता.
आरोपीस अटक केल्यापासून कारागृहात 9 वर्षे झाली असून केस मध्ये केवळ 8 साक्षीदार तपासले आहेत तसेच शेवटचा साक्षीदार 6 महिन्यापूर्वी तपासण्यात आला असून आरोपीची केस चालवण्यास दिरंगाई होत आहे असा युक्तिवाद आरोपिंच्या वकिलांमार्फत करण्यात आला. दरम्यान, आरोपी व सरकार पक्षांचा युक्तिवाद ए. एस. किलोर यांच्या कोर्टाने आरोपीस जामीन मंजूर केला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली.