उरुळी कांचन, (पुणे) : येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात शनिवारी (ता. १९) राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब भगत व उपप्राचार्य डॉ. अविनाश बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. रविंद्र मुंढे यांनी केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता हिच देशाची खरी ताकद असून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकता कशी जोपासली पाहिजे.
तिचे महत्त्व पटवून देशाच्या सर्वांगीण विकासात कसा वाटा वाढवणे गरजेचे असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
यावेळी प्राध्यापक अमोल बोत्रे, शितोळे निलेश, नंदिनी सोनवणे, अंजली शिंदे, विजय कानकाटे, ए. एम. जगदाळे, रोहिणी शिंदे, शुभांगी रानवडे, रामचंद्र बाराटक्के, शारीरिक शिक्षण संचालक करण जैन आदी उपस्थित होते.
सर्व प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेऊन महाविद्यालयीन परिसर, रस्ता व खेळाचे मैदान यांची स्वच्छता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका अनुप्रिता भोर यांनी केले तर आभार प्रा. शेख यांनी मानले.