Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लघुउद्योग संघटनेच्या कार्यालयासाठी जागेचा प्रश्न सुटला ; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रशासनाला आदेश…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 20 November 2022, 13:42

पिंपरी : पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कार्यालयासाठीच्या जागेचा प्रश्न अखेर सुटला असून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी औद्योगिक महामंडळाच्या हद्दीतील भूखंड संघटनेच्या कार्यालयासाठी उपलब्ध करुन द्यावा, असे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमाला उपस्थित लावली होती. त्यावेळी १५ दिवसांत पुन्हा शहराचा दौरा करून उद्योगांच्या मागण्यांबाबत चर्चा करणार, असे आश्वासन त्यांनी दिले होते.

दिलेला शब्द पूर्ण करीत उद्योगांच्या समस्यांबाबत येत्या बुधवारी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही उद्योगमंत्री सामंत यांनी दिले आहे.

 

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचा मेळावा मोशी येथे उत्साहात पार पडला. यावेळी उद्योजकांनी विविध समस्या आणि मागण्या उद्योगमंत्र्यांसमोर मांडल्या.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, जयंत कड, संचालक संजय सातव, संजय जगताप, विनोद नाणेकर, तात्या सपकाळ, सुरेश तात्या म्हेत्रे, प्रविण लोंढे, संजय ववले, विजय खळदकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेची स्थापना दि. २४ ऑक्टोबर १९८० रोजी झाली आहे. गेल्या ४२ वर्षांपासून ही संघटना उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत आहे. पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील सुमारे ४ हजार उद्योजक या संघटनेचे सभासद आहेत.

सध्या चिंचवड येथील थरमॅक्स चौक येथे संघटनेचे छोटे कार्यालय आहे. संघटनेच्या कामकाजाकरिता सदर कार्यालयाची जागा अपुरी पडत असून, औद्योगिक महामंडळाच्या हद्दीतील सुमारे १ हजार चौरस फूट जागा संघटनेच्या कार्यालयाकरिता विनामूल्य उपलब्ध व्हावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली होती.

पिंपरी-चिंचवड महापालिका औद्योगिक परिसर आणि चाकण औद्योगिक पट्टयातील उद्योगांच्या समस्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने वीज समस्या, शास्तीकर, रेड झोनमधील पायाभूत सुविधा, भूयारी गटार योजना व सी.इ.टी.पी.प्लांट, कचरा समस्या, अग्निशमन केंद्र, बस सुविधा, अनधिकृत झोपड्या व भंगार दुकाने, वाहतूक कोंडी यासह महापालिका प्रशासनाकडून अपेक्षीत असलेल्या पायाभूत सोयी-सुविधा याबाबत मेळाव्यात चर्चा करण्यात आली.

तसेच, सह्याद्री स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित या महिलांच्या संस्थेला चाकण औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. २ या भूखंडावरील बांधकामाबाबत शेतकऱ्यांकडून होणाऱ्या अडथळ्याबाबत तोडगा काढण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे आश्वासनही उद्योगमंत्री सामंत यांनी दिले आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, लघुउद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी पहिल्यादा राज्याचे उद्योगमंत्री पिंपरी-चिंचवड शहरात आले. अनेक नेत्यांनी आणि मंत्र्यांनी केवळ बैठका आणि मोठ्या कंपन्यांचे भूमिपूजन केले. परंतु, प्रश्न सुटले नाही. सर्वाधिक महसूल देणारे लघुउद्योग मात्र वंचित राहीले.

महापालिका आणि राज्य सरकारकडे आम्ही पाठपुरावा केला. कोविड काळात लघुउद्योजकांनी कर्ज काढून कामगारांना जपले. पण, वीजबिल भरले नाही, म्हणून महाविकास आघाडीच्या काळात लघुउद्योजकांची वीज कनेक्शन तोडले. आता राज्यात सत्ताबदल झाला आहे.

बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा महायुतीच्या सत्ताकाळात लघुउद्योगांसह शहरातील सर्वसामान्य नागरिकांवर लादलेला शास्तीकर सरसकट रद्द करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

पुणे- नाशिक महामार्गावर कार पाच ते सहा वेळा पलटी ; १ ठार तर ८ जण गंभीर जखमी ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.