मुंबई : मुंबईतील मालाडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मालाड येथे बांधकाम सुरु असलेल्या 23 मजली इमारतीच्या 20 व्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग कोसळल्याने 3 मजूरांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना आज दुपारी (दि. 05 सप्टेंबर) घडली आहे.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम या ठिकाणी असलेल्या गोविंद नगर भागात अनेक इमारतींचे बांधकाम सुरु आहे. यातील बांधकाम सुरु असलेल्या नवजीवन इमारतीचा स्लॅब आज दुपारी साडे बारा च्या सुमारास कोसळला. ही इमारत झोपडपट्टी पुनर्वसनातंर्गत बांधली जात आहे. ही इमारत Gr + 20 अशा स्वरुपाची आहे. या इमारतीच्या 20 व्या मजल्याचे काम सुरु होते. या 20 व्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरु असताना अचानक हा स्लॅब कोसळला. यात तिघांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra | Three people died and three were injured after a part of the slab collapsed of the 20th floor of Gr + 23 floors under construction building. The incident took place while the labourers were working and suddenly the slab collapsed. All the injured have been admitted…
— ANI (@ANI) September 5, 2024
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस पोहोचल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.