लोणीकंद : हवेली तालुक्यातील आव्हाळवाडी येथील ग्रामपंचायत कार्यलयातून सन २०२१-२२ सालची फर्निचर ई टेंडर फाईल चोरून नेल्या प्रकरणी ग्रामसेवकांच्या तक्रारीवरून लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपस पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात माहिती अधिकारात सॅन २०२१-२२ सालाची ई टेंडर फाईल मागविण्यात आली होती. ग्रामपंचायत कार्यालयाने सदरच्या फाईलची माहिती देखील दिली होती.
त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पूर्वीचे ग्रामसेवक तुकाराम पाटील यांनी येथील कर्मचाऱ्याला फर्निचर फाईलच्या वर्क ऑर्डरची प्रत मागितली.
यानंतर कर्मचाऱ्याने सध्याचे ग्रामसेवक अतुल कोहिनकर यांना सांगितले. त्यानंतर फाईल सापडत नसल्याचे दोघांच्या लक्षात आले, आणि फाईल चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.
या प्राकारानी अतुल कोहिनकर यांनी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.