उरुळी कांचन : शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शितोळे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची मागील 60 वर्षापासून दुरावस्था झाली होती. या रस्त्याचे काम सुरु झाले असून परिसरातील नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
रस्त्याच्या बाजूला जमीन असलेल्या शिंदवणे येथील काही शेतकऱ्यांनी रस्ता रुंदीकरण करण्यासाठी मागील 60 वर्षापासून विरोध केला होता. निधी उपलब्ध होऊनहि खी शेतकरी रस्ता होऊ देत नसल्याने हा निधी वारंवार माघारी जात होता. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. परिसरात वारंवार छोटे-मोठे अपघात घडत होते. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरु नाही झाले तर शिंदवणे येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश शितोळे व विकास महाडिक यांनी आमरण उपोषणाचा इशारा प्रशासनाला व स्थानिक ग्रामपंचायतीला दिला होता.
या रस्त्यावरून उरुळी कांचन, शिंदवणे, सासवड, जेजुरीकडे जाणाऱ्या नागरिकांनी मोठी वर्दळ असते. त्यातच पावसाळ्यात छोटे -मोठे अपघात होत असल्याने शाळेतील मुलांच्या बसेस तसेच अन्य गाड्या मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत होती. शिंदवणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष गणेश महाडिक यांनी संबंधित शेतकरी व गणेश शितोळे यांच्याशी चर्चा करून रस्त्याचा विषय मार्गी लावला. यावेळी गणेश शितोळे यांनी उपोषण मागे घेऊन रस्त्याचे काम सुरु झाले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गणेश शितोळे यांनी दिली.
दरम्यान, शिंदवणे ग्रामस्थ, परिसरातील शेतकरी, उरुळी कांचन पोलीस, माजी सरपंच गणेश महाडिक यांच्या सहकार्याने हा रोडचा प्रश्न सोडवण्यात मोलाचे सहकार्य केल्याने उपोषणाचा घेतलेला निर्णय मागे घेतला असल्याची माहिती गणेश शितोळे यांनी सांगितले.
याबाबत बोलताना शिंदवणे येथील माजी सरपंच व तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेश महाडिक म्हणाले, “दोन्ही बाजूचे शेतकरी कचरू शितोळे, शिवाजी महाडिक, संभाजी महाडिक, दिगंबर महाडिक, अनिल महाडिक, वसंत माने, वामन माने, या सर्व शेतकऱ्यांशी चर्चा केली. 60 वर्षापासून सदरचा रोड हा 8 फुटाचा असल्याने अनेक अडचणींना सामना करावा लागत असल्याची माहिती दिली. यावेळी या सर्व शेतकऱ्यांनी क्षेत्र देऊन सहकार्य केले व सदरचा रस्ता 14 फुटांचा करण्यात येत आहे. यामध्ये शिंदवणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरु केले आहे.