मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. आमच्या मनात सावरकर यांच्याविषयी आदरच आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने अभिवादन केल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. तसेच बुलढाणा येथे होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभेला उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी शिंदे व फडणवीस सरकारकडून टीका केली जात असताना उद्धव ठाकरे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली.
सावरकर यांच्या विषयी मनात आदर आहेच. मात्र सत्ताधाऱयांनी हा मुद्दा उपस्थित केल्याचा आम्हाला आनंद आहे. मात्र स्वातंत्र्यासाठी काय योगदान दिले ? पाकिस्तानातील किती जमीन तुम्ही राज्यात आणली? तुम्ही काश्मीरमध्ये सत्तेसाठी काय केलंत? अशा प्रश्नांची साबरबत्ती देखील केली. त्याबरोबरीने लोकांना उगाच संभ्रमित करु नका असा सल्ला देखील दिला.
राहुल गांधींनी स्वतः उद्धव ठाकरे यांना फोन करून भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी व शेगाव येथील सभेत उपस्थित राहण्यासाठी आग्रह केला होता. मात्र याबाबत उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषदेत विचारले असता नकारार्थी मान आणि हात हलवत उत्तर दिले.