राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातून वाहणाऱ्या खडकवासला नविन कालव्याचे सिमेंट अस्तरीकरणास गेल्या काही दिवसांपासुन जोरदार सुरुवात झाली असुन तालुक्यातील बोरीभडक ते यवत या परिसरातील कालव्याचे अस्तरीकरण सध्या चालु करण्यात आले आहे,
यवत येथे गेल्या काही दिवसांपासुन दोरगेवाडी ते आनंदग्राम नविन कालव्याचे अस्तरीकरण चालु झाले असुन ते सध्याच्या घडीला अंतिम टप्प्यात आले आहे.
अस्तरीकरण केल्यानंतर कालव्याच्या पाण्याचा पाझर संपून जाईल व त्याचा परिणाम शेतीच्या पाण्यावर व पिण्याच्या पाण्यावर देखील होईल, अशी भीती या भागातील शेतकरी व नागरिकांना सतावत आहे.