नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार पाहिला मिळत आहे. काही दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात आता वाढ झाली आहे. जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आणि देशांतर्गत मागणीत वाढ झाल्यामुळे सराफा बाजारात सोन्याचा भाव 1,100 रुपयांनी वाढून 72,450 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
गेल्या काही दिवसांत हा दर 71,350 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला होता. आता यामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. ‘इंडिया बुलियन असोसिएशन’च्या माहितीनुसार, ‘चांदीचा भावही 1,400 रुपयांनी वाढून 82,500 रुपये प्रति किलो शुक्रवारी झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात तो 81,100 रुपये प्रति किलो होता. राजधानी दिल्लीत 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 1,100 रुपयांनी वाढून 72,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, जो मागील ट्रेडिंग सत्रात 71,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
सोन्याच्या दरात वाढ होण्याचे कारण म्हणजे ग्राहकांकडून वाढती मागणी यांसह इतर काही कारणे सोन्याचे दर वाढण्यामागे असल्याचे अर्थविषयक जाणकारांचा म्हणणे आहे.
असे आहेत पुण्यातील सोन्याचे दर…
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 69,730 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत काही फरकाने वाढली आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 64,540 रुपये झाला आहे. याशिवाय, चांदीचे दर प्रतिकिलो 81,600 रुपयांवर गेले आहेत.