लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान, रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुकडील १५ मीटर (सुमारे पन्नास फुट) अंतराच्या आतील सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यास सोमवारी (ता. १४) अतिक्रमण विरोधी पथकाने सुरुवात केली आहे.
एन. एच. ए. आयचे अभियंता रोहन जगताप व त्यांचे सहकारी जेसीबी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दुपारनंतर आणखी कारवाईचा वेग वाढणार असल्याचे रोहन जगताप यांनी संगीतले आहे.
कार्यवाही सुरू आसतांना बघ्यांची एकच गर्दी झाली आहे. ही अतिक्रमण विरोधी मोहीम सोमवारी सकाळी सुरू झाली ती सायंकाळपर्यंत सुरू राहणार आहे. पोलिस बंदोबस्तात हे अतिक्रमण हाटविण्यात येत आहे.
दरम्यान, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने याबाबतची नोटीस पंधऱा दिवसापुर्वी वर्तमानपत्रात दिली होती. यात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी टोलनाका ते कासुर्डी या दरम्यान रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुकडील १५ मिटर (पन्नास फुट) अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करणार असल्याचे नमुद केले होते.
दरम्यान, अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे स्वतःहुन न हटविल्यास, अतिक्रमण कारवाईचा खर्च अतिक्रमणधारकांकडुन वसुल करण्यात येणार असल्याचे नोटीशीत स्पष्ट करण्यात आले होते.
मात्र कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान एकाही अतिक्रमणधारकाने स्वतःहुन अतिक्रमण हटविले नसल्याने, एनएचएआय सोमवारपासून अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे संगीतले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.