Weather Update : मुंबई : दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर चक्रीवादळ तयार झालं आहे. हवामान खात्याद्वारे या वादळाला ‘बिपारजॉय’ हे नाव देण्यात आले आहे. हे चक्रीवादळ सरासरी समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटरपर्यंत पसरलं आहे. या चक्रीवादळामुळे पुढील २४ तासांत दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे. अशी माहिती बिपरजॉय वादळासंदर्भात मुंबई हवामान खात्याने ट्विट करत माहिती दिली आहे. (Cyclone Biparjoy likely to hit Mumbai and Konkan coast in next 24 to 48 hours)
मुंबई हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बिपारजॉय हे वादळ ५ जून रोजी अरबी समुद्रात तयार झाले असून येत्या २४ तासांत चक्रीवादळ निर्माण झालेल्या प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता भारताच्या हवामान विभागाने वर्तवली आहे. (Weather Update) या चक्रीवादळाचे केंद्र समुद्राच्या खोलवर असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फारसा पाऊस पडण्याची शक्यता नाही. मात्र समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. मागच्या तीन तासात हे वादळ ११ किलोमीटर प्रति तासच्या वेगाने पुढे सरकले आहे.
मच्छिमारांना सावधगिरीचा इशारा
बिपरजॉय वादळामुळे पश्चिम किनारपट्टीसह उत्तर भागात धोका निर्माण झाला आहे. हे चक्रावादळ समुद्राच्या पृष्ठभागापासून ५.८ किलोमीटरपर्यंत पसरले आहे. (Weather Update) त्याचा वेग ४०-५० ते ६० किलोमीटर प्रति तास असा अंदाज आहे. यादरम्यान समुद्रात उंच लाटा उसळतील.त्यामुळे हवामान खात्याने मच्छिमारांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. पुढील ४८ तासांत चक्रीवादळ जवळपास उत्तरेकडे सरकण्याची आणि आग्नेय आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रावरील दबाव क्षेत्र तीव्र होण्याची शक्यता आहे. खोल समुद्रात मासेमारीसाठी समुद्रात जाताना मच्छीमारांनी सावध राहावे’ असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :