Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : आषाढी वारीसमवेत यंदाही राज्य महिला आयोगाची आरोग्य व महिला सुरक्षा वारी असणार : रुपाली चाकणकर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 June 2023, 20:57

Pune News : पुणे: आषाढी वारीसमवेत यंदाही राज्य महिला आयोगाची आरोग्य व महिला सुरक्षा वारी असणार आहे. वारीतील महिलांच्या आरोग्याची तसेच सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे. यासाठी वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली असून त्यांच्याकडून काळजी घेतली जाईल, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सांगितले. (Along with Ashadhi Wari, there will also be Health and Women’s Safety Wari of the State Women’s Commission this year; Rupali Chakankar)

या वारीला १० जूनला (शनिवार) निवडुंगा विठोबा मंदिरात सकाळी १० वाजता या वारीला प्रारंभ होईल. त्यानंतर पुढे थेट पंढरपूरपर्यंत वारीबरोबरच ही वारीही चालत जाणार आहे. (Pune News) वारी मार्गावरील पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांच्या प्रशासनाचे आरोग्य व महिला वारकरी सुरक्षा वारीसाठी साह्य मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांना वारी सुसह्य व्हावी हा उद्देश

चाकणकर म्हणाल्या, लाखो महिला या वारीत असतात. अनेक अडचणी सहन करून त्या वारी पूर्ण करतात. त्यांचे प्रश्न, अडचणी सुटाव्यात, त्यांना वारी सुसह्य व्हावी हा या वेगळ्या वारीचा उद्देश आहे. (Pune News) मागील वर्षी ही वारी यशस्वी झाली, त्यामुळे यंदाही आयोगाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

 

पालखी मार्ग, मुक्काम, विसावा येथे कार्डिओ आणि अँम्ब्युलन्स, गावातील महिला बचत गट, आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत औषधे उपलब्ध करून देण्यात येतील. सँनिटरी नँपकीन, त्याचे विघटन याचे नियोजन, करण्यात आले आहे.(Pune News)  पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, संपुर्ण पालखी मार्गावर महिलांसाठी १४०० तात्पुरती शौचालये व्यवस्था करण्यात आली असून तिथे पाणी, लाईट, महिला समन्वयक यांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्नानगृहाची व्यवस्था, कपडे बदलासाठी आडोसा स्थानिर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने करण्यात येत आहे. संपुर्ण मार्गावर, राहायच्या ठिकाणी स्वच्छ प्रकाश असेल यासाठी ५ दिवस आधीपासूनच लाईटची व्यवस्था करण्यात येत आहे.

पुणे, सातारा व सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांमधील जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते यांची यासाठी मदत झाली आहे अशी माहिती चाकणकर यांनी दिली. (Pune News) संपूर्ण वारी महिलांसाठी विनासमस्या व्हावी याची काळजी आयोगाच्या वतीने घेण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. पुण्यातील १० जूनच्या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र धंगेकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : शिक्षण क्षेत्रात खळबळ: शिक्षण आयुक्तांनी थेट ‘एसीबी’ला पत्र दिल्याने शिक्षण विभागातील लाचखोर अडचणीत येणार

Pune News : अक्षय भालेराव हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्याची मागणी; ‘लोकजनशक्ती पार्टी’चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Pune News : झोपण्यावरुन झालेल्या वादात पुण्यातील तरुणाला दिले पेटवून; मुठेश्वर मंदिराजवळील वाचनालयातील घटना

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32
Next Post

Weather Update : येत्या २४ ते ४८ तासांत बिपारजॉय चक्रीवादळ मुंबई आणि कोकणच्या सागरी किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.