आजचे हवामान: आज महाराष्ट्रात हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस राहील. महाराष्ट्रातील काही शहरात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. काल हवामान विभागाने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. दरम्यान, आज काही ठिकाणी महाराष्ट्रात हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. परंतु राज्यातील अनेक भागात नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहे. आजचे राज्यातील हवामान पाहता, काही भागातील तापमान 40 अंशांवर पोहोचले आहे. उत्तर तेलंगणामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई: शहरात हवामान दमट राहण्याची शक्यता आहे. परंतु दुपारी उन्हाचा झळा सोसाव्या लागणार आहेत. कमाल तापमान ९६°F (३५.५°C) आणि किमान तापमान ७५°F (२३.९°C) असेल. हवेची गुणवत्ता खराब आहे.
नागपूर: नागपूर खूप उष्ण असेल, कमाल तापमान ९८°F (३६.७°C) आणि किमान तापमान ६६°F (१८.९°C) असेल. हवेची गुणवत्ता चांगली आहे.
पुणे: पुण्यात २९°C ते २७°C या दरम्यान तापमान राहणार असून पावसाची शक्यता शून्य टक्के असेल, दरम्यान, वातावरण सौम्य असेल.
बुलढाणा, ब्रह्मपूरी, अकोला, मालेगाव, सोलापूर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ येथे 35 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे.